ड्राय डेचाही भेदाभेद: महापुरूषांच्या जयंती दिनी मद्य विक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक
ड्राय डेचाही भेदाभेद: महापुरूषांच्या जयंती दिनी मद्य विक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक
अनिल गांगुर्डे /वणी
महापुरूषांच्या जयंतीच्या दिवशी सर्व मद्य विक्री सुरु बंद ठेवण्याचे परिपत्रक जारी असले तरी काही विशिष्ट महापुरुषांच्या जयंती दिनी ड्रायडे जाहीर केला जात नसल्याने जयंत्या महोत्सवाच्या कार्यक्रमात नविन तळीरामाची वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
महापुरूषांच्या जयंतीच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ड्रायडे जाहीर करणे आवश्यक आहे.शिव जयंती व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवशीचा ड्रायडे नसल्याने नविन मद्यप्पिंच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने मोठी चिंतेची बाब निर्माण होऊ लागली आहे.जयंती महोत्सव म्हटले अगदी लहान तेरा चौदा वर्षांची मुले मजा म्हणून दारू पिण्यास सुरवात करतात काहींची मजा ही त्या दिवसा पुरती असते तर काहींना लत लागते.ही घातक बाब निर्माण झाली आहे.१९फेब्रुवारी शिवजयंती १४एप्रील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सर्वच दुकाने उघडी दिसल्याने जनतेत नाराजीचा सुर निर्माण झाला आहे.प्रशासनाच्या धोरणांबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली.जगाला आदर्श महापुरूषांच्या जयंतीदिनी उत्तुंग झेप घेण्या साठी संकल्प केले जातात परंतु काही ठिकाणी अश्या प्रकाराने पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे.वणी परिसरातील नागरिकांनी या बाबत रोष व्यक्त केला.किमान महापुरूषांच्या जयंती दिनी ही दुकाने बंद ठेवणे क्रमप्राप्त आहे.या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग चौकशी केली असता वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्या नंतर त्यांची अंबलबजाणी केली जाते.
“राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,३०जाने.हुतात्मा दिन,१मे महाराष्ट्र दिन,आषाढी एकादशी,१५ऑगष्ट कार्तिकी एकादशी,२ऑक्टो.महात्मा गांधी जयंती व गणेश चतुर्दशी या दिवशी सर्वच बार वाईन शाॅप देशी दारू दुकाने बंद असतात या व्यतिरिक्त निवडणुकी दरम्यान ठरलेल्या नियमा नुसार बंद ठेवली जातात.इतर वेळी बंद ठेवण्याच्या सुचना मा.जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येतात.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तसा अहवाल पोलिस विभागा कडुन गेल्यास बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी हे घेतात.त्यांनी आदेश दिल्या नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग त्याची अंमलबजावणी करते.परंतु यावेळी असे काही आदेश आले नसल्याने ही दुकाने बंद ठेवता आली नाही.”
चंद्रकांत पाटील.
पोलीस निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग
——
—–ज्या प्रमाणे १५ ऑगस्ट,२६ जानेवारी महात्मा गांधी जयंती इतर मद्द्य विक्री दुकाने या वेळी बंद ठेवता.जगाला आदर्श असे महापुरूष छत्रपती शिवाजीमहाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी बंद का ठेऊ शकत नाही.या दिवशी ही दुकाने बंद ठेवल्यास शासनाचा महसुल कमी होतो यात शासनाला महसुल महत्वाचा वाटतो.अश्या महापुरूषांच्या जयंतीच्या दिवशी अनेक लहान व नविन मद्दप्पी तयार होतात ही बाब गंभीर आहे.याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे.
संविधान गांगुर्डे
जिल्हा महासचिव,
वंचित बहुजन युवा आघाडी, नाशिक



