क्राईम

जेसीबी इंडियाचा महाराष्ट्रात विस्तार; नाशिकमध्ये नवीन 3एस डीलरशिप सुविधा सुरू  _नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील ग्राहकांना एकाच ठिकाणी विक्री, सेवा आणि सुटे भाग (पार्ट्स) मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार_ 


जेसीबी इंडियाचा महाराष्ट्रात विस्तार; नाशिकमध्ये नवीन 3एस डीलरशिप सुविधा सुरू

 _नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील ग्राहकांना एकाच ठिकाणी विक्री, सेवा आणि सुटे भाग (पार्ट्स) मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार_ 

नाशिक प्रतिनिधी

जेसीबी इंडियाने आज नाशिकमध्ये आपल्या नवीन डीलर सुविधा ‘रत्नप्रभा वर्ल्ड’चे उद्घाटन केले. या सुविधेमुळे महाराष्ट्रातील जेसीबीचा विस्तार आणखी वाढला आहे. या सुविधेमुळे नाशिक तसेच आसपासच्या भागातील ग्राहकांना जेसीबीच्या विविध मशीनची माहिती, खरेदीसाठी मार्गदर्शन तसेच विक्रीनंतरची सेवा आणि सुटे भाग एकाच ठिकाणी मिळणार आहे. सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रफळात उभारलेल्या या सुविधेमध्ये 4-बे वर्कशॉप असून, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी 150 अनुभवी कर्मचाऱ्यांची टीम येथे कार्यरत आहे.

उद्घाटनप्रसंगी जेसीबी इंडियाचे श्री. दीपक शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, जेसीबी इंडिया म्हणाले, “महाराष्ट्रात पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्राचा वेगाने विकास होत आहे. त्यामुळे बांधकाम उपकरणांची मागणी सातत्याने वाढत आहे. नाशिकमध्ये आमच्या नवीन डीलरशिप सुविधेचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. रत्नप्रभा समूहासोबतची ही आमची दुसरी भागीदारी आहे. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून, येथे शेती आणि उद्योग क्षेत्राचा चांगला विकास झाला आहे. नवीन महामार्ग आणि एमआयडीसी क्षेत्राच्या वाढीमुळे नाशिकचे महत्त्व आणखी वाढले आहे. रत्नप्रभा समूहासोबत मिळून आम्ही ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

Advertisement

रत्नप्रभा मोटर्स ही गेल्या जवळपास दोन दशकांपासून जेसीबीची विश्वासू भागीदार आहे. समान मूल्ये आणि सातत्यपूर्ण विकासाच्या आधारावर ही भागीदारी मजबूत झाली आहे. आता या भागीदारीच्या नव्या टप्प्यात पवार कुटुंबाची दुसरी पिढी व्यवसायाचा विस्तार पुढे नेत आहे. नाशिकमधील ही सुविधा रत्नप्रभा वर्ल्डचे मुख्यालय म्हणून काम करणार असून, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथील पाच शाखांचे व्यवस्थापन येथून केले जाणार आहे.

ही सुविधा जेसीबीच्या जागतिक दर्जाच्या मानकांनुसार आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. तसेच येथे लाइव्हलिंक कमांड सेंटर’ ही अत्याधुनिक टेलिमॅटिक्स प्रणाली उपलब्ध आहे. या प्रणालीच्या मदतीने मशीनची कामगिरी, सर्व्हिसची गरज, वापर आणि सुरक्षिततेची माहिती रिअल-टाइममध्ये मिळते. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या मशीनचा ताफा 24 तास प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतो.

जेसीबी इंडियाकडे बांधकाम क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या उपकरणांची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. यामध्ये बॅकहो लोडर्स, ट्रॅक्ड एक्स्कॅव्हेटर्स, व्हील्ड लोडर्स, कॉम्पॅक्टर्स, टेलिहँडलर्स, मिनी एक्स्कॅव्हेटर्स आणि स्किड स्टीअर्स यांचा समावेश आहे. याशिवाय नवीन अॅग्रिमॅक्स रेंज, डिझेल जनरेटर सेट्स आणि अॅक्सेस प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची आधुनिक उपकरणे आणि संपूर्ण समाधान उपलब्ध करून दिले जात आहेत.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *