क्राईम

व्हॉइस ऑफ मीडिया महिला प्रदेश कार्यकारिणी निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रदेश अध्यक्ष म्हणून नाशिकच्या मारवाडी, यवतमाळच्या चंद्रे यांना पसंती, कार्याध्यक्ष पदावर शेलार, धोंडगे यांची निवड 


व्हॉइस ऑफ मीडिया महिला प्रदेश कार्यकारिणी निवडणुकीचा निकाल जाहीर;

 

प्रदेश अध्यक्ष म्हणून नाशिकच्या मारवाडी, यवतमाळच्या चंद्रे यांना पसंती, कार्याध्यक्ष पदावर शेलार, धोंडगे यांची निवड 

मुंबई प्रतिनिधी

व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या एकमेव आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न झाली असून नाशिक जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या अध्यक्षा रश्मी मारवाडी या सर्वाधिक मते घेऊन प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडून आल्या आहेत.दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सविता चंद्रे उमरखेड यवतमाळ या प्रदेशाध्यक्ष ग्रामीण या पदासाठी दावेदार ठरल्या आहेत. स्वाती धोंडगे आणि आणि प्रतिभा शेलार या कार्याध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. स्वाती धोडगे,सविता चंद्रे,रश्मी मारवाडी,प्रतिभा शेलार,ज्योती सरपाते या पाच महिला उमेदवारांनी या निवडणुकीत सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रातील महिला सदस्यांनी गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी सायं. पाच वाजता पसंती क्रमानुसार मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.

Advertisement

महिला विंग सदस्य नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने हे मतदान झाले, ऍड.संजीव कुमार कलकोरी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांच्यासह राष्ट्रीय आणि प्रदेश कार्यकारिणीने नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संघटनात्मक बांधणीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व प्रकारच्या पत्रकारांचे मजबूत संघटन म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत असून मुद्रित माध्यमासोबत डिजिटल, इलेक्ट्रॉनिक,साप्ताहिक, रेडिओ, यु ट्यूब, महिला विंग अशा विविध शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखाचा कारभार पाहण्यासाठी लोकशाही पद्धतीने कारभारी निवडण्याची प्रथा व्हॉइस ऑफ मीडियाने स्थापनपासून जपली असून त्याच प्रथेचा एक भाग म्हणून महिला प्रदेश कार्यकारिणीसाठी निवडणुक घेण्यात आली होती.

पत्रकारितेत महिलांचा सहभाग वाढवणे,महिला पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवणे , त्यांचे हक्क यासाठी संघटन कौशल्य पणाला लावून कामकाज करणे या ध्येय धोरणावर व्हॉइस ऑफ मीडियाची महिला प्रदेश विंग कार्यरत आहे.ही निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच नूतन कार्यकारिणी पदभार स्वीकारून उर्वरित प्रदेश कार्यकारिणी जाहीर करून महिला जिल्हा अध्यक्षांची निवड करणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *