डोंगर दऱ्यात रस्ता माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे स्वप्न; कुटुंब लागले कामाला..
डोंगर दऱ्यात रस्ता
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे स्वप्न;
कुटुंब लागले कामाला..
सुरगाणा (प्रतिनिधी) सुरगाणा तालुक्यातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला डांगराळे ते गोगुळ रस्ता बांधकाम करणे स्वर्गीय माजी खासदार हरिचंद्र चव्हाण यांचे स्वप्न होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे काम मंजूरही झालेले होते. सुरगाणा तालुक्यातील अति दुर्गम भागात देखील डोंगरदऱ्यात रस्ता झाला पाहिजे हे स्वर्गीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चव्हाण कुटुंबीय कामाला लागले आहेत .आज रस्ता कामाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कलावती हरिश्चंद्र चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष समीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुरगाणा ठाकरे गट तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे शिंदे गट तालुकाप्रमुख हरिभाऊ भोये, सुरगाणा नगरसेवक विजय कानडे आणि सरपंच,सदस्य असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . या वेळीं ग्रामस्थांतर्फे आनंद व्यक्त केला गेला आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब अमर रहे या घोषणा देण्यात आल्या.