सागर स्वीटस् बाबतचा “तो”व्हिडीओ फेक; सायबर पोलिसांत तक्रार दाखल
सागर स्वीटस् बाबतचा “तो”व्हिडीओ फेक;
सायबर पोलिसांत तक्रार दाखल
नाशिक- प्रतिनिधी
येथील प्रसिध्द मिठाईचे दुकान सागर स्विटस बाबत व्हायरल होत असलेला व्हिडियो फेक असून, या दुकानात अशा कोणत्याही स्वरूपाची घटना घडली नसल्याचा दावा सागर स्विट्सचे संचालक दीपक चौधरी यांनी केला असून, सदर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोध सायबर शाखेकडे तक्रार देण्यात आली आहे.
गत 35 वर्षांपासून नाशिकमध्ये उत्कृष्ठ मिठाईचे दुकान म्हणून सागर स्वीटस् चा लौकीक आहे. मात्र व्हायरल व्हिडीओत एका व्यक्तीने मिठाई खरेदी करताना बॉक्स उघडुन बघितला असता त्या मिठाई किडे आढळून आले आहेत. ती घटना नाशिकच्या सागर स्वीटस् मध्ये घडल्याचा दावा सदर व्हिडीओत करण्यात आला आहे. माञ ही बाब सागर स्वीटस् चे संचालक दीपक चौधरी यांच्या पर्यंत पोहचली असता त्यांनी त्वरित सायबर पोलिसात या बाबत तक्रार दाखल केली असून, हा व्हिडीओ पाच वर्षा पूर्वीचा असून, तो इतर कुठल्या तरी शहरातील आहे. त्यात छेडछाड करून नाशिकच्या सागर स्विट्सची बदनामी होईल असा प्रकार करण्यात आला आहे. याबाबत चौधरी यांनी गंगापूर रोड पोलीस ठाणे व नाशिक सायबर शाखेत अज्ञात व्यक्ती विरुद्ध तक्रार दिली असून, पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.