क्राईम

मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत कबड्डीपटूची आत्महत्या ; तब्बल १५ तासांच्या शोधानंतर नेवाशाजवळ सापडला मृतदेह


आय लव्ह यू मम्मी!

माझा मम्मीत खूप जीव आहे…

मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे…

मुर्दाडांनो!! आणखी किती जीव घेणार??

विरोध करतांना घसा छिन्न छिन्न का होत नाही….

 

मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत कबड्डीपटूची आत्महत्या

 

तब्बल १५ तासांच्या शोधानंतर नेवाशाजवळ सापडला मृतदेह

 

शनिशिंगणापुर :-प्रतिनिधी

 

आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात निवड न झाल्याने आलेले नैराश्य तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण कबड्डीपटूने प्रवरासंगम येथील पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. महेश ऊर्फ ओम मोहन मोरे (२०, रा. आखणी देवगाव, ता. नेवासे, हल्ली रा. बजाजनगर, वाळूंज) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता त्याने नदीत उडी मारली. त्यानंतर रात्रभर त्याचा शोध सुरू होता. अखेर १५ तासांनंतर नेवासे हद्दीत त्याचा मृतदेह सापडला. नेवासे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

Advertisement

महेशचे वडील खासगी कंपनीत चालक आहेत. आई व लहान भावासह मोरे कुटुंब बजाजनगरात राहतो. रात्री ८ वा. आईने मेसेज पाहिल्यानंतर महेशचा शोध सुरू झाला. त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन गोदावरी पुलाजवळ मिळाले होते.

——-

माझा मम्मीमध्ये खूप जीव आहे…

 

मंगळवारी सायंकाळी ७.१५ मिनिटांनी आपल्या मोबाइलवर आईला उद्देशून संदेश पाठवला. त्यात त्याने म्हटले, ‘मिस यू आई, जय व पप्पा.. मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. समाजासाठी एक जीव माझा. पण.. जय, तू आईसोबत कायम राहा, माझा मम्मीमध्ये खूप जीव आहे. पुढे चांगली जिंदगी जगा. आय लव्ह मम्मी..’


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *