कैलास दातीर यांना लोकसभेची उमेदवारी द्या;ना.बच्चूभाई कडू यांना कार्यकर्त्यांचे साकडे
कैलास दातीर यांना लोकसभेची उमेदवारी द्या ;
ना.बच्चूभाई कडू यांना कार्यकर्त्यांचे साकडे
नाशिक | प्रतिनिधी
समाजसेवेचे व्रत घेतलेले गोरगरीब दिव्यांगांसाठी नेहमी झटणारे शेतकरी कामगारांसाठी अहो रात्र लढणारे कैलास दातीर यांची जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे. ते छत्रपती ग्रुप जिल्हाध्यक्ष व कामगार संघटनेच्या माध्यमातून सहकारी बँक संचालक पदाच्या माध्यमातून, विविध समित्यांच्या माध्यमातून तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष या माध्यमातून त्यांच्या कामाचा समाजसेवेचा त्यांनी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे . त्यांना नामदार बच्चू कडू यांनी लोकसभेची नाशिक उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.
- नाशिक जिल्हा अध्यक्ष शरद संपत शिंदे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्ताभाऊ बोडके व महाराष्ट्र प्रदेश समन्वय संध्याताई जाधव यांनाही दातीर यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी साकडे घातले आहे. या जिल्ह्याला बेरोजगारी मुक्त करण्यासाठी, शेतकर्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी व उद्योग कंपन्या मधील ठेकेदारी पद्धत ५% वर आणण्यासाठी जास्तीत जास्त कामगारांना कायम करण्यासाठी,नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक जाती धर्माला,प्रत्येक घटकाला न्याय मिळण्यासाठी ते दिल्ली दरबारी प्रयत्न करतील हीच त्यांची हमी आहे . म्हणून त्यांना उमेदवारी द्यावी. प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा संघटक वैशाली अनवट, डुबेरचे सरपंच ज्ञानेश्वर ढोली कामगार उपाध्यक्ष कमलाकर शेलार ,सिन्नर प्रहारचे संपर्कप्रमुख सुनिल जगताप ,ओबीसी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, पांढुली गण प्रमुख सुनील शेठ वाघ ,दिव्यांग तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, कार्याध्यक्ष विलास खैरनार प्रभारी कांचन भालेराव , महिला तालुकाअध्यक्ष पुष्पा भोसले ,दिव्यांग कार्याध्यक्ष संदीप आव्हाड प प्रहार तक्रार निवारण समिती अध्यक्ष गणेश मस्के, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, सिन्नर मिडीया सेलचे तालुकाध्यक्ष प्रविण पवार शेतकरी संघटनेचे नेते शेतकरी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मामा डावरे ,युवा नेते कपिल कोठुरकर ,साने बाबा ,राजेंद्र कोठुरकर ,तालुका उपाध्यक्ष खंडू बिन्नर, युवा तालुका अध्यक्ष संदीप शिरसाट, मुसळगाव गटप्रमुख रामकृष्ण शिंदे निवृत्ती बाबासाहेब, तालुका संघटक प्रकाश थोरात, शहर कार्याध्यक्ष गणेश थोरात, भाऊसाहेब वाडेकर ,कार्याध्यक्ष आशा गोसावी ,नायगाव गटप्रमुख दता बोडके, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष प्रहार रज्जाक मामू सय्यद यासमवेत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी कैलास दातीर यांना नाशिक लोकसभेचे उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे.