येवला ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था… स्पेशल पर्पज व्हेइकल इंजिन स्थापना करून मिशन मोडवर रस्ते दुरुस्ती करा… भागवतराव सोनवणे यांची मागणी
येवला ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था…
स्पेशल पर्पज व्हेइकल इंजिन स्थापना करून मिशन मोडवर रस्ते दुरुस्ती करा…
भागवतराव सोनवणे यांची मागणी
येवला :-प्रतिनिधी
हम रस्ते सोडले की चिखलच चिखल आणि ऊन पडून चिखल वाळला की ट्रॅक्टरच्या टायरच्या साईजच्या आसाऱ्या हे चित्र येवला तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्रच आहे…
अतिवृष्टीने गेलेले पीक यामुळे शेतकरी आधीच संतप्त आहेत…. त्याच्या जगण्यात कोणताच आनंद उरलेला नाही, राज्य शासन तोंडाला पानेच पुसणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, पण किमान दैनंदिन दळणवळण तरी ठीक असावे ना?
ज्या गावात जावे तिथं लोक रस्त्याच्या मोठ्या तक्रारी करत आहेत..तळवाडे–विठ्ठलवाडी–गवंडगाव तसेच गारखेडा–देवठाण या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे.हीच अवस्था सर्व ग्रामीण भागात आहे…
“दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर मेटकुटीला आले आहेत…
तालुक्यातील सर्वच रस्ते मिशन मोडवर निबर दगडी जाड मुरूम टाकून रोड रोलरने तातडीने दाबून द्यावेत; त्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांची अधिकार असलेली समिती बनवून रॉयल्टी फ्री गौण खनीज उपलब्ध करुन द्यावे. तालुक्यातील सर्व रस्ते ठेकेदार यांची मशीनरी वापरून तालुक्यातील ग्राम रस्ते 8 दिवसात खड्डे, चिखल, मुक्त करावे, अन्यथा नाईलाजाने आंदोलन करावे लागेल…”
भागवतराव सोनवणे
संयोजक :- कर्ज मुक्त शेतकरी अभियान
########
सध्या येवला तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यावर २ ते ३ फूटाचे मोठमोठे खड्डे पडल्याने विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांना, शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना अक्षरशः खड्ड्यातून व चिखलातून जावं लागत आहे.
रुग्णांना व गरोदर महिलांना दोन किलोमीटर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीतून न्यावे लागते.
हम रस्त्यांचा विकास ठीक आहे…
येवला–नांदगाव,येवला–रहाडी,येवला–वैजापूर,येवला–कोपरगाव,येवला–पाटोदा–लासलगाव हे
हम रस्ते सोडले तर छोट्या छोट्या गावांना जोडणारे रस्ते —
गावठाण ते वाडी वस्ती रस्ते, वाडी वस्ती रस्ते ते शिवार रस्ते आणि शिवार रस्ते ते शेत शिवार रस्ते — यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही…
***********
जिल्हा परिषदेने केलेल्या रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जा सुमार आहे..
आता महिला विद्यार्थीनी देखील तक्रार करायला पुढे येत आहेत.
👉तळवाडे रेल्वे गेट भारम रोड पासून ते देवळाणे चौफुली पर्यंत
👉 तळवाडे पासून ते विठ्ठलवाडी मार्गे गोंडगाव शिव रस्ता पर्यंत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे
👉मगर वस्ती ते देवठाण शीव रस्ता
ही यादी फक्त प्रतिनिधिक आहे, तालुक्यातील सर्वच हमरस्ते सोडल्यास अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे..
***********
यांनी व्यक्त केला संताप
*********
मनीषा आरखडे, मीना आरखडे, विमल आरखडे, मुक्ता गाडे, मीना गाढे, सविता गाढे, अलका आरखडे, हलीमा पटेल, तसेच विद्यार्थिनी अनुश्री आरखडे यांनी देखील आपला संताप व्यक्त केला.
*************
संतप्त नागरिक :-
चंद्रभान पगारे; नाना पगारे; सतीश पगारे; अनिल पगारे; छबु पगारे; कानू गोरडे; अंकुश गोरडे; सोन्याबापु गोरडे; ज्ञानेश्वर भागवत; सुदाम भागवत; बाबुराव भागवत; रामनाथ भागवत; रमेश भागवत; प्रकाश मगर; सूर्यकांत मगर; संतोष मगर; संतोष वरपे; दीपक मगर; सोमनाथ भागवत; ज्ञानेश्वर भागवत; बाळासाहेब भागवत; बाळासाहेब आरखडे; परसराम आरखडे; सुरेश आरखडे; प्रमोद भागवत; प्रकाश भागवत; धुपा आरखडे; सागर भागवत; सोमनाथ भागवत; सीताराम भागवत; तुळशीराम भागवत; गोपीनाथ भागवत; आबा भागवत; सजन भागवत; तुकाराम भागवत; भाऊसाहेब पगारे; बाळू पगारे; वाल्मीक गोरे; बाळू गोरे; कालु भाई; हर्षद पटेल; नवाज पटेल; साहिल पटेल; स्लम पटेल; नंदू भागवत; नाना भागवत; कृष्णा भागवत; नितीन भागवत; संदीप भागवत; सचिन भागवत; दत्तू भागवत; सुहास भागवत