भुसावळ येथे राज्यस्तरीय आरएसपी अधिकारी प्रशिक्षण दिमाखात संपन्न; विद्यार्थ्यांसाठी आर एस पी विषय महत्वपूर्ण ॲडिशनल एस पी अशोक नखाते
भुसावळ येथे राज्यस्तरीय आरएसपी अधिकारी प्रशिक्षण दिमाखात संपन्न;
विद्यार्थ्यांसाठी आर एस पी विषय महत्वपूर्ण ॲडिशनल एस पी अशोक नखाते
भुसावळ प्रतिनिधी –
पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या अधिकारांतर्गत सुरू असणारा R S.P&C D या अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव तसेच श्रीमती कल्पना चव्हाण माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रदीप साखरे नाशिक विभागाप्रमुख RSP&CD यांचे द्वारें बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते .रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन ,कोल्हापूर या राज्य संघटनेकडून हा विषय महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबवला जातो या विषयाचे दहा दिवसीय निवासी नाशिक विभागाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये नाशिक विभागातील एकूण 58 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते, या प्रशिक्षणाचे उद्घाटन संजय गरुड चेअरमन शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी यांच्या हस्ते, राहुल वाघ सो, पोलीस निरीक्षक भुसावळ शहर पोलीस स्टेशन, यांच्या अध्यक्षतेखाली झाले प्रसंगी जितेंद्र पाडवी प्रभारी तहसीलदार भुसावळ, डॉ.संगीता बियाणी सचिव बियाणी एज्युकेशन ग्रुप तसेच डॉ. प्रदीप साखरे विभागीय प्रमुख R.S.P&C.D नाशिक, सौ पूर्वा गुरव अतिरिक्त जिल्हा समादेशक रायगड ओंकार पाटील जिल्हा समादेशक सांगली, संतोष पाटील शिबिर अधिकारी डॉ. संजय निकम समादेशक जळगाव या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले .सदर दहा दिवसाचा निवासी प्रशिक्षण कालावधीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये पदकवायत दुपारच्या सत्रामध्ये वाहतूक नियंत्रण ,अग्निशमन ,नागरी सुरक्षा ,प्रथमोपचार या विषयाचे अभ्यास वर्ग अशा वेळापत्रकानुसार सत्रे पार पडली सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये विविध विषयाचे अभ्यासक यांचे मार्गदर्शन देखील लाभले.
Advertisement
नरवीरसिंह राऊळ आपत्ती व्यवस्थापनअधिकारी ,जळगाव .यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती चर्चासत्र घेतले त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद्धा महाजन मॅडम व त्यांची टीम यांनी सांकेतिक चिन्हे वाहतूक नियमन, स्पीड गन ,व विविध प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शनपर चर्चासत्र घेतले. त्याचबरोबर भुसावळ नगर परिषद अग्निशमन विभागाचे भोळे यांनी आग व आगीचे प्रकार तसेच आपत्ती जनक परिस्थितीमध्ये घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिके दाखवली तसेच डॉक्टर तुषार पाटील यांनी प्रथमोपचार व भुसावळ ट्रामा सेंटरचे डॉक्टर प्रदीप फेगडे व त्यांची टीम यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अपघातात घ्यावयाची काळजी याविषयीचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण शाखा भुसावळ चे पीएसआय सय्यद मुजफ्फर अली व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षा विषयी मार्गदर्शन केले प्रशिक्षण कालावधीमध्ये नागरीसंरक्षण व वाहतूक सुरक्षा याविषयी घेण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमावर ती चर्चासत्र ही पार पडली या प्रशिक्षणाचा समारोप दिमागदार पासिंग आऊट परेडने पार पडला या पासिंग आऊट परेड साठी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्ह्याचे एडिशनल एस पी अशोक नखाते हे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणार्थी यांना दहा दिवसाच्या निवासी प्रशिक्षण कालावधीमध्ये पोलीस विभागाचे ड्रील इन्स्ट्रक्टर हरीश कोळी, आशिष चौधरी, दीपक पाटील, संतोष सुरवाडे यांनी पदकवायत व ड्रिल विषयाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले व पोलीस उपाधीक्षक यांच्यासमोर पद कवायतीचे प्रात्यक्षिक दाखवले
रायगड जिल्ह्याच्या अतिरिक्त समादेशक सौ पूर्वा गुरव यांनी सिग्नल पेटी व आदर्श चौक याचे प्रात्यक्षिक घेतले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये परेड कमांडर सेकंड कमांडर यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या याप्रसंगी ॲडिशनल एसपी अशोक नकाते यांनी हा विषय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी आर एस पी विषय आपल्या शाळांमध्ये चांगल्या पद्धतीने राबवावा व विद्यार्थ्यांना सदर विषयाचे ज्ञान द्यावे सदर समारोपाच्या कार्यक्रमासाठी बियाणी संस्थेच्या आयुषी बियाणी , एस.डी.भिरूड अध्यक्ष माध्यमिक शिक्षक पतपेढी तथा सचिव महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, डॉ. प्रदीप साखरे नाशिक विभागीय समादेशक , प्राचार्य डी एम पाटील , बियाणी मिलिटरी स्कूल, कलाध्यापक संघाचे अरुण सपकाळे, नंदुरबार जिल्हा समादेशक विष्णू जोंधळे, बुलढाणाचे श्री गायकवाड व संकेत धामंदे यांची उपस्थिती होती. डॉ प्रदीप साखरे, डॉ.संजय निकम, संतोष पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व प्रशिक्षणामधील नियोजनाचा भार पाहिला अशा उत्साह पूर्व वातावरणामध्ये नाशिक विभागाकडून आयोजित आर एस पी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. यशस्वीते साठी बियाणी मिलिटरी स्कूलचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा समादेशक विष्णू जोंधळे यांनी केले.