ताज्या घडामोडीशिक्षण

नॅबच्या वतीने राज्यातील ८२ दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे वितरण


नॅबच्या वतीने राज्यातील ८२
दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे वितरण

नाशिक प्रतिनिधी :

जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्दीने मेहनत करण्याची गरज आहे, आजच्या काळात तंत्रज्ञानाला महत्त्व आले असून तंत्रज्ञानाच्या साह्याने दिव्यांग विद्यार्थी देखील वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले कार्य करू शकतात, असे दिसून येते. जीवनात वाटचाल करताना नेहमी पुढे जात राहा, मागे पडू नका, निराश होऊ नका,असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले.
तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून या विद्यार्थ्यांना आणखी १०० स्मार्ट फोन उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही संदीप कर्णिक यांनी दिले.
नॅब महाराष्ट्राच्या वतीने राज्यातील ८२ दृष्टि बाधित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मार्टफोनचे वाटप नॅब संकुल येथे बुधवार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी संदीप कर्णिक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ब्लू क्रॉस कंपनीचे संजीव माहुली, ध्रुव चावडा, चिराग मेहता, नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री मानद महासचिव गोपी मयूर व सहसचिव (जनसंपर्क ) मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे आदि उपस्थित होते. तर देणगीदार वसंतराव राठी आणि व्हाईस ऑफ सॅपचे संस्थापक प्रणव देसाई हे आभासी तथा ऑनलाइन पद्धतीने अमेरिकेतून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी सांगितले की,
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र ही दिव्यांग क्षेत्रात कार्य करणारी राज्यात अग्रगण्य अशी स्वयंसेवी संस्था असून संस्थेचे कार्य जून १९८४ पासून राज्यात सुरू आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्राच्या राज्यात १८ जिल्हा शाखा असून गोंदिया व रायगड येथे अॅक्टिव्हिटी सेंटर सुरू आहे. नॅब महाराष्ट्राच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, ज्ञापच्यावतीने दिव्यांग आणि दृष्टी बाधित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत या संस्थेतून बाहेर पडलेले विद्यार्थी अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत, यात सनदी अधिकारी, सीए ,बँक अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत. तसेच कला व क्रीडा क्षेत्रातही या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली आहे, नॅब संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही, संस्थेचा संपूर्ण आर्थिक कारभार हा लोकसहभागातून करण्यात येतो. आता या उपक्रमातून राज्यातील ८२ दृष्टी बाधित विद्यार्थ्यांना स्मार्टफोन हे अमेरिका येथील व्हाईस ऑफ स्पेशलिटी अॅबल्ड पीपल्स या सामाजिक संस्थेने प्रायोजित केले आहेत. या स्मार्टफोन साठी दहा लाख रुपये देणगी देण्यात आली आहे, अशी माहिती रामेश्वर कलंत्री यांनी दिली.
मानद महासचिव गोपी मयूर यांनी प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा परिचय करून दिला. दिव्यांगाना तसेच विशेष दृष्टी बाधित्व व बहु विकीलांग विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार त्यांचे हक्क पुनर्वसन करण्याचे काम व प्रामुख्याने शासकीय योजनांची माहिती त्याचबरोबर बदलत्या काळानुसार शैक्षणिक साहित्याची माहिती याचा लाभ मिळवून देण्यासाठी नॅबही संस्था नेहमी प्रयत्नशील आहे. शैक्षणिक साहित्य, विशेषतः ब्रेल लिपीतील पुस्तके, पाटी, पांढरी काठी तसेच अन्य रोजगाराच्या दिशेने आवश्यक ती मदत देऊन त्यांना कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नॅब महाराष्ट्रच्या वतीने राज्यातील ८२ दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लुई ब्रेल, हेलन केलर व सरस्वतीच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए.आर. भारद्वाज, डॉ. राजेंद्र कलाल, व्ही. एच. पाटील, डॉ. प्रा. सिंधू काकडे, मंगला कलंत्री, प्रकल्प सहाय्यक रत्नाकर गायकवाड, तांत्रिक सहाय्यक वाल्मीक पाटील , खजिनदार विनोद जाजू ,कार्यकारी संचालक विनोद जाधव, संचालक प्रदीप सराफ आदी उपस्थित होते. वर्षा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव (जनसंपर्क ) मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले.

Advertisement

स्मार्टफोनचे लाभार्थी :
ईश्वरी पांडे -नागपूर, वृषाली करपट -नाशिक, प्रवीण राठोड – तुळजापूर, पूर्णिमा मर्दानी -कोल्हापूर, अर्चना राठोड -लातूर, गणेश निंबाळकर – सातारा, अल्बिना शेख- नाशिक, राजश्री टोके -जळगाव, भाग्यश्री केरे – छत्रपती संभाजीनगर यांना प्रतिनिधीक स्वरूपात स्मार्टफोनचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच काही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यात रमेश केरे, ईश्वरी पांडे, अर्णव अब्दागिरे, सुजित सोनवणे यांचा समावेश होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *