. *पार्वताबाई आरोटे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन*
. *पार्वताबाई आरोटे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन*
अकोले ( प्रतिनिधी )
तालुक्यातील चितळवेढे येथील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदाय परिवारातील व्यक्तिमत्व गं .भा पार्वताबाई बाबुराव आरोटे यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले
त्या चितळवेढे गावचे माजी उपसरपंच आनंदराव आरोटे, रघुनाथ आरोटे, निवृत्ती आरोटे यांच्या मातोश्री व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या आजी होत्या. चितळवेढे सोसायटी च्या संचालिका सौ परिघा आरोटे यांच्या आजेसासू होत्या. त्यांचे पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
चितळवेढे ता. अकोले येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.