ताज्या घडामोडी

*सिन्नर येथे प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटना यांची आढावा बैठक संपन्न*


*सिन्नर येथे प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटना यांची आढावा बैठक संपन्न*

सिन्नर प्रतिनिधी

Advertisement

तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटना प्रहार यांची संयुक्तपणे बैठक आज पार पडली . नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे दिव्यांग जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे जनशक्ती व दिव्यांग संघटनेचे निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश निमंत्रक दिव्यांग उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हे उपस्थित होते. प्रदेश निमंत्रक संध्याताई जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उत्तर महाराष्ट्र दिव्यांग अध्यक्ष जेकब अण्णा पिल्ले हे उपस्थित होते. नाशिक जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शिंदे व दिव्यांग जिल्हाध्यक्ष नाशिक रविंद्र आप्पा टिळे या दोघांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले संभाजीनगर येथे होणाऱ्या मेळ्याव्या मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सिन्नर तालुक्यामधून येण्याचे आदेश दिले . संध्या ताई जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले . नामदार बच्चू कडू यांची नाशिक जिल्ह्यामध्ये येण्यासाठी सिन्नर वरून पहिली सुरुवात भिकुसा हाय स्कूल येथून केशव बिडवे दिव्यांग कार्यकर्ता व ललित सोनवणे यांनी सिन्नर मधून सुरुवात केली व पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहारचा पाय रोवला गेला. बच्चू कडू यांचा लाडका तालुका सिन्नर हा नाव लौकिक आहे असे जाधव म्हणाले जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर यांची स्तुती केली. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोरा शिक्का म्हणून तालुका अध्यक्ष केलं या तालुक्यांमध्ये जनशक्ती वाढवण्यामध्ये कैलास दातीर यांची मोठी कामगिरी आहे.. त्यांनी या तालुक्यांमध्ये प्रहार पक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले. ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची ताकद आहे असे म्हणाले यावेळेस दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष ग्रामीण भाऊसाहेब सांगळे / तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड व अनेक पदाधिकाऱ्यांचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर यांनी या तालुक्यातील बेरोजगारी कर्जमाफी लिफ्ट योजना कर्जमाफी समुद्रात वाहून जाणारे पाणी, तालुक्यातील अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणे अशा प्रश्नावर वाचा फोडून हा प्रश्न संभाजीनगर च्या मोर्चा मध्ये नामदार बच्चू कडू यांच्याकडे जनशक्ती जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत मोर्चामध्ये हा विषय घ्यावा ही मागणी केली.. यावेळेस संध्याताई जाधव दिव्यांग जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब आण्णा पिल्ले कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर कार्याध्यक्ष दिव्यांग जिल्हा ग्रामीण भाऊसाहेब सांगळे अँड विलास खेरनार, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली अनवट ,दिव्यांग तालुकाध्यक्ष संदीप आव्हाड ,महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भोसले ,प्रभारी कांचन भालेराव ,कार्याध्यक्ष आशाताई गोसावी ,,कार्याध्यक्ष दत्ता लोंढे, राहुल चतुर ,,पांडुरंग आगळे ,विलास दराडे, बापू सानप, गटप्रमुख बाळू मानेकर ,शेतकरी अध्यक्ष चंद्रकांत डावरे, प्रभारी कांचन भालेराव ,, युवा नेते कपिल कोतुरकर, प्रकाश थोरात उपाध्यक्ष अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रजक मामा सय्यद ,,देशदूत चे पत्रकार सुनील वाघ संपर्कप्रमुख सुनील जगताप ,,गटप्रमुख दत्तू बोडके तालुका सचिव प्रियांका कश्यप ,कार्याध्यक्ष आशाताई गोसावी, पांडुरंग आगळे ,मीडिया तालुकाप्रमुख प्रवीण पवार जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे व अँड प्रहार चे तालुका कार्याध्यक्ष विलास खैरनार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले*


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *