क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

ठकबाजीचा गुन्हा दाखल असलेल्या कथित पत्रकाराचे पोलिस रेकाॕर्ड तपासणे गरजेचे; गुन्हा दाखल होताच जनमाणसात उमटल्या प्रतिक्रिया


ठकबाजीचा गुन्हा दाखल असलेल्या कथित पत्रकाराचे पोलिस रेकाॕर्ड तपासणे गरजेचे;
गुन्हा दाखल होताच जनमाणसात उमटल्या प्रतिक्रिया

नाशिक प्रतिनिधी

Advertisement

कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत शेतीची प्रशासाकीय व कायदेशीर कामे करुन देण्याचे अमिष आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात दाखवल्याचा आरोप असलेल्या वणी येथील संदिप भिकाजी अवधुत याचे विरोधात सलग तक्रारी पोलिस अधिकारी यांचेकडे आदिवासी शेतकरी यांनी केल्यानंतर अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची प्रतिक्षा आहे.दरम्यान संदिप भिकाजी अवधुत रा.दत्तनगर , कसबे वणी याचे विरोधात अभोणा पोलिसात ठकबाजीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला तर उर्वरीत तीन तक्रारीची चौकशी सुरु आहे.पोलिस रेकाॕर्डची पार्श्वभूमी वरीष्ठांनी तपासणे आवश्यक असल्याचा सुर उमटतो आहे.
अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवण, सुरगाणा परिसरात या ठगबाजी करणाऱ्या तोतयाच्या पूर्व कर्माची कथा वाचली जात आहे.वणी पोलिस ठाण्यात संदिप अवधुत व इतर दोघे याचेवर सन 2017 साली अदखलपात्र गुन्हा दाखल आहे, त्याचा नोंद क्रमांक 744/2017 असा आहे.दिनांक 8/4/2018 रोजी अदखल पात्र दुसर्या गुन्ह्याची नोंद आहे.त्याचा नोंदणी क्रमांक 204/18 असा आहे.त्यानंतर सन 2019 साली संगनमताने फसवणुक व बनावटीकरण केल्याच्या आरोपावरुन दखल पात्र गुन्हा दाखल आहे.सन 2021 साली दिनांक 6/5/2021 रोजी प्रथम खबर क्रमांक 0268 अन्वये अनुसुचित जाती जमाती कायद्या अन्वये व शिवीगाळ ,मारहाण जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या एका शिक्षकाच्या तक्रारीवरुन वणी पोलीसात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही दखल पात्र गुन्ह्यातील एका गुन्ह्यात पोलिस कोठडी तर दुसऱ्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहाची हवा संदिप अवधुत याने खाल्ली आहे. एवढेच नाही तर विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी दिनांक 22/10/2020 रोजी विभागीय आयुक्त यांना लेखी पत्र दिले आहे. त्यात दिंडोरी तालुका ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कामकाजाबाबत विभागीय आयुक्त ,जिल्हा परीषद , पंचायत समीती यांचेकडे तथ्यहीन व चुकीच्या तक्रारी संदिप अवधुत याने केल्याचा उल्लेख आहे.तक्रारीच्या चौकशीत सत्यता आढळुन आलेली नाही. आर्थिक तडजोडीसाठी या तक्रारी केल्याचे नमुद आहे
. तसेच ग्रामपंचायतीच्या सुरळीत कामकाजात वैयक्तिक स्वार्थासाठी व अर्थार्जनासाठी तक्रारी करुन विकास कामात खिळ घालण्याचे काम केले आहे,त्यामुळे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांची काम करण्याची मानसिकता राहीलेली नाही. तसेच त्यांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. तरी वैयक्तिक आकसापोटी आर्थिक तडजोडीसाठी केलेल्या तक्रारीची दखल घेऊ नये असा स्पष्ट उल्लेख नामदार झिरवाळ यांच्या लेखी पत्रात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिनांक 23/10/2023 रोजी याची पोहोच सही शिक्या निशी दिली आहे.प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाही. दिनांक 5/5/2021 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डिएनई136) संलग्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ ,तालुका शाखा दिंडोरी यांनी कळवण पोलिस उपविभागीय अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातुन आर्जव केले आहे. दिंडोरी तालुक्यातील 60% ग्रामपंचायतीच्या वर माहीती अधिकारात माहीती मागविल्याचा उल्लेख आहे तसेच गंभीर स्वरूपाच्या आरोप करण्यात आला आहे..विशेष बाब म्हणजे यावर योग्य वेळी अपेक्षित व आवश्यक कारवाई झाली नसल्याने मनोधैर्य वाढलेल्या संदिप अवधुत याचे तापदायक उद्योग सुरु असल्याचे आदीवासी शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या माध्यमातुन पुढे आल्याने याची गंभीर दखल वरीष्ठ पाताळीवरुन घ्यावी व योग्य व ठोस कारवाई करावी असा सुर उमटतो आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *