क्राईम

१५ कोटींच्या मोबदल्यात गव्हर्नर पद;  फसवणुक करणारा महाठग गजाआड


१५ कोटींच्या मोबदल्यात गव्हर्नर पद;

 

 फसवणुक करणारा महाठग गजाआड

 

 

नाशिक प्रतिनिधी

कोणत्याही राज्याचे राज्यपाल पद मिळवून देतो, त्याचा सर्व्हिस चार्ज म्हणून १५ कोटी द्यावे लागतील, अशी थाप मारुन तामिळनाडूतील एका इच्छुकाला पाच कोटीला गंडा घालणाऱ्या महाठगास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात माहिती अशी की, निरंजन सुरेश कुलकर्णी रा. फ्लॅट नं. 7, सेवन श्री अपार्टमेंट, श्री गंधर्व नगरी, मोटवानी रोड, नाशिक याने फिर्यादी यांस माझी बरीच ओळख असुन मी कोणत्याही राज्याचे गव्हर्नर पद मिळवुन देवु शकतो व त्याकामापोटी सर्विस चार्ज म्हणुन मला 15 कोटी रूपये दयावे लागतील असे आरोपीने फिर्यादीस सांगुन विश्वासात घेतले होते.

Advertisement

आरोपी निरंजन कुलकर्णी याने फिर्यादीस नाशिक शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावुन फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी, मी काम केले नाहीतर माझे नावे असलेली जमिनीचे खरेदीखत तुमचे नावे करून देईन असे सांगुन फिर्यादी यांना पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्पा जवळील 100 एकर जमिन शासनाकडुन लिजवर घेतलेले बाबतचे भारत सरकारचे मोहर असलेले बनावट दस्तऐवज व चांदशी नाशिक येथील आरोपीताच्या नावावर असलेली जमिनीचे बनावट दस्तऐवज दाखवुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. आरोपीतांने दाखविलेले जमिनीचे कागदपत्र व शासनाकडील कागदपत्र पाहुन फिर्यादीने आरोपीस 5,08,99,876/- रक्कम दिली.

आरोपी याने दाखविलेल्या कागदपत्रांची फिर्यादी यांनी खात्री केली असता दिलेले कागदपत्र हे बनावट असल्याचे समजल्याने त्यांनी आरोपीतांकडे दिलेले पैसे परत मागीतले. पैसे देण्यास नकार देवुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी नससिम्मा रेड्डी रा. कोट्टीवक्कम, थिरूवन्मीयुर चेन्नई राज्य तामिळनाडु यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे येथे दिलेल्या तकारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(5),336(2), 336(3), 338, 341 (1),342 (2),351 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी निरंजन सुरेश कुलकर्णी यास अटक करण्यात येऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मध्यवर्ती गुन्हेशाखा, नाशिक शहर हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *