क्राईम

नाशिकस्थित डॉक्टरांच्या खुनाची सुपारी देणारी महिला जेरबंद …….. ठाणे खंडणी विरोधी पथकाने विषारी इंजेक्शन, डॉक्टरच्या फोटोसह घेतले ताब्यात


नाशिकस्थित डॉक्टरांच्या खुनाची सुपारी देणारी महिला जेरबंद

……..

ठाणे खंडणी विरोधी पथकाने विषारी इंजेक्शन, डॉक्टरच्या फोटोसह घेतले ताब्यात

 

आपली दुनियादारी / ठाणे

नाशिकच्या डॉक्टरशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून पन्नास लाखांची खंडणी देत नाही म्हणून त्यांच्या जीवावर उठलेल्या एका महिलेला ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून पुराव्यासह अटक केली आहे.

या महिलेला दि.२४ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

यासंदर्भात ठाणे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेहा, रा. बाळकूम, ठाणे ही महिला नाशिक मध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचा खून करण्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न करीत असून योग्य मारेकऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती ठाणे शहर खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहरचे वपोनि शेखर बागडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावेळी त्यांनी बनावट मारेकरी म्हणून एका इसमास पाठवुन मिळालेल्या बातमीची खातरजमा केली. त्यानंतर नेहा जाधव या संशयित महिलेने बनावट मारेकरी म्हणून पाठविलेल्या इसमास नाशिक स्थित डॉक्टरचा खुन करण्यासाठी तीन लाख रूपयात सुपारी देवुन,डॉक्टरांचा फोटो, कामाच्या ठिकाणाची माहिती, विषारी इंजेक्शन, सिरींज बनावट मारेकऱ्यास दिले.

Advertisement

 

अशाप्रकारे सदर बनावट मारेकऱ्याची या महिलेविरोधात विरोधात फिर्याद घेवुन कापुरबावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. 82/2024 भादवि कलम 115 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर महिला आरोपी नामे नेहा उर्फ जोत्स्ना, वय 47 वर्षे ,रा. बिल्डींग नं. 60, बी. विग. रूम नं. 201 अशोकनगर, बाळकुम पाडा, ठाणे प. हीस दिनांक 21/01/2024 रोजी 00ः30 वा अटक करण्यात आली आहे. सदर महिलेची दिनांक 24/01/2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

या महिलेकडे अटकेनंतर करण्यात आलेल्या तपासात सदर महिलेचे डॉक्टरांसोबत मैत्रीपुर्ण संबंध होते. त्याचा फायदा घेवुन सदर महिला ही डाॅक्टरांना ब्लॅकमेल करून 50 लाख रूपये खंडणीची मागणी करीत होती. सदर रक्कम न दिल्यास त्यांना जिवे ठार मारण्याची वारंवार धमकी देत होती असे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या य मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहरचे वपोनि शेखर बागडे, मपोनि वनिता पाटील, सपोनि सुनिल तारमळे, सपोनि श्रीकृष्ण गोरे, सपोनि भुषण कापडणीस, पोउनि विजयकुमार राठोड, सपोउनि सुभाष तावडे, पोहवा संजय राठोड, सपोउनि संजय बाबर, पोहवा सचिन शिंपी, मपोहवा शितल पावसकर, मपोशि मयुरी भोसले, पोशि अरविंद शेजवळ, चापोनाभगवान हिवरे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *