क्राईम

देवळा -चांदवड, बागलाण विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ ; भाजपच्या वरिष्ठांचा आदेश धुडकावला;  केदा आहेर आणि साधना गवळी उमेदवारीवर ठाम


देवळा -चांदवड, बागलाण विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ ;

 

भाजपच्या वरिष्ठांचा आदेश धुडकावला;

 

 केदा आहेर आणि साधना गवळी उमेदवारीवर ठाम

 

 

कुबेर जाधव /देवळा

देवळा चांदवड विधानसभा मतदार संघात भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्यासमोर घरातूनच आव्हान उभे राहिले असताना तिकडे बागलाण मध्येही दिलीप बोरसे यांना साधना गवळी यांनी आव्हान दिले आहे.

या दोन्ही भाजप बंडखोरांनी, महामंडळाचा प्रस्ताव धुडकावून दोन्ही ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत धुमधडाक्यात हजारोंच्या उपस्थितीत नामांकने दाखल केली आहेत. देवळा चांदवड मतदारसंघाचे हेवीवेट उमेदवार केदा नाना आहेर यांनी तर सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते,यांना बरोबर घेऊन अपक्ष उमेदवारी दाखल करत देवळा चांदवड विकास आघाडी बनवून प्रचारात आघाडी घेतली आहे.

मागिल आठवड्यात देवळा व चांदवड येथे सर्व पक्षीय हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधला व आपलीं भुमिका जाहीर केली. त्यामानाने महायुती, महाआघाडी, परिवर्तन महाशक्ती या तिन्हीही आघाड्यांवर काहीसी शांतताच होती.खरे चित्र माघारीनंतरच स्पष्ट होईल.

तिकडे बागलाणमध्ये भारतीय जनता पक्षाचे

विद्यमान आमदार दिलीप बोरसे आणि देवळ्याचे डॉ, राहुल आहेर यांची डोके दुखी मात्र वाढली आहे, या दोघांनाही ही निवडणूक सोपी नसल्याचे मतदारसंघात फेरफटका मारल्यावर जाणवते.

Advertisement

नाशिक जिल्ह्यातील या दोन्ही ग्रामीण मतदारसंघात भाजपा उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. या हेवी वेट बंडखोरांची समजूत काढण्यासाठी संकटमोचक मंत्री महाजन नाशिकला आले होते. त्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले.नाशिक पश्चिम मतदार संघातील बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. अन्य नाराज नेते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात मंत्री महाजन यशस्वी झाले आहेत.

मात्र बागलाण आणि चांदवड -देवळा मतदार संघातील आव्हान कायम असल्याने गिरीश महाजन यांना ठोस उपाययोजना करता आली नाही. त्यामुळे ते जळगावला आल्या पावली परत गेले आहेत.

नाशिकहून जळगावला परत जाताना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार आणि नाफेडचे संचालक केदा आहेर , यांच्याशी चर्चा केली.तसेच साधना गवळी यांचे यजमान सहकार अधिकारी असलेले वसंत गवळी यांच्याशी फोन वरून चर्चा केली. बंडखोर भाजपा उमेदवार साधना गवळी व केदा आहेर यांना त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली. आगामी काळात पक्षाकडून सन्मानपूर्वक पुनर्वसन केले जाईल, असे ठोस आश्वासन यावेळी महाजन यांनी दिले. तसेच साधना गवळी यांना महामंडळावर वर्णी लावण्याचे सुचक आश्वासनही दिले.मात्र या आश्वासनाने साधना गवळी व केदा आहेर यांचे समाधान झाले नाही.

त्यामुळे आपण उमेदवारी बाबत ठाम आहोत. उमेदवारी मागे घेण्याची वेळ निघून गेली आहे, असे स्पष्ट मत केदा आहेर आहेर आणि गवळी यांनी मंत्री महाजन यांना सांगितल्याचे कळते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *