वेल डन शहर पोलिस:एक साल में कितना बदल गया……!! एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे तीन महिला व एक पुरुष जेरबंद ; ६,१३,३२०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त
वेल डन शहर पोलिस:एक साल में कितना बदल गया……!!
एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे तीन महिला व एक पुरुष जेरबंद ;
६,१३,३२०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………………………………..
कुमार कडलग /नाशिक
पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील म्हणजेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अधिपत्याखालील अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कामगिरी करून काही जीव नक्कीच वाचवले, त्याबद्दल अभिनंदन करीत असतानाच “एक साल मे कितना बदल गया नाशिक आयुक्तालय” असे म्हणण्याचे धाडस करावे लागेल. होय! कारण कुठल्या ऐकीव माहितीवर नाही तर अनुभवातून हे धाडस करतो आहोत.
या बदलाचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत.
सन २०२३ मध्ये पोलिस आयुक्तालयातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही व्यक्तिगत पातळीवर शहरातील एम डी रॅकेट्स बाबत सखोल माहिती दिली होती. इतकंच नाही तर काही घरभेदी या रॅकेटशी हितसंबंध जपत असल्याची माहिती देखील दिली होती. सोबतच सर्वात धक्कादायक म्हणजे अनेक कर्मचारी आणि त्यांची मुले या भयानक नशेच्या आहारी गेले असल्याने या रॅकेटचा पर्दाफाश करणे किती अत्यावश्यक आहे. अशा आशयाचा संदेश पाठवून धडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली होती. तॊ दिवस होता २४ जुलै २०२३ आणि वेळ होती रात्री १०. २९ वा.
त्यानंतर देखील एम डी आणि गोवंश कत्तल बाबत अनेकदा सजग संदेश पाठवले, उत्तर तर नाहीच, कारवाई नाही. उलट प्रतिपक्षाला टीप देण्याची प्रथा जपली गेली. दुर्दैवाने थोड्याच दिवसात म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात साकी नाका पोलिसांनी नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा मारून मेफेड्रोनची कंपनी सील करीत १३३ किलो एमडीसह २५० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त केला, तोपर्यंत नाशिक पोलीस अनभिज्ञ होते. २४ जुलै आणि त्यानंतरच्या काळात मिळालेल्या माहितीची शहनिशा केली असती तर कदाचित ही नामुष्की ओढवली नसती. तत्कालीन पोलिसिंग आणि विद्यमान पोलिसिंग यातील फरक स्पष्ट जाणवत असल्यानेच एक साल मे कितना बदल गया नाशिक पोलिस आयुक्तालय असे म्हणण्याचे धाडस आम्ही करीत आहोत.
केवळ एम डी च्या संदर्भातच नाही तर गोवंश कत्तल रोखण्याचे प्रमाण देखील या एका वर्षात सर्वाधिक आहे. हे विशेष कौतुकास्पद कामगिरी म्हणून दखलपात्र ठरते.
दिनांक १०/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोअं/२३३० अविनाश फुलपगारे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीने माहिती मिळाली की गणेश कैलास गिते वय-४५ वर्षे, रा. मखमलाबाद ता.जि. नाशिक, स्वीटी सचिन अहिरे वय २८ वर्षे, रा. फलॅट नं २२, प्रकाश कॉम्प्लेक्स श्रीधर कॉलनी मेहरधाम मंदिर पेठ रोड नाशिक, ऋतुजा भारकर झिंगाडे वय-२२ वर्षे, रा. रूम नं ६, शिवाजी पार्क, शिवाजी नगर, गाजरे हॉस्पीटल जवळ, नाशिक, पल्लवी गणेश निकुंभ उर्फ सोनाली शिंदे वय ३६ वर्षे, रा. नोवा हॉस्पीटलच्या शेजारी, साईनगर, अमृतधाम पंचवटी नाशिक हे एमडी हा अंमली पदार्थ (ड्रगस्) विक्री करत आहेत.
मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा नाशिक शहरचे प्रभारी अधिकारी वपोनि lश्रीम. सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, अंमलदार यांनी कौशल्याचा वापर करून, शिताफीने दिनांक १०/०१/२०२५ रोजी नमुद तीन महिला आरोपी व एक पुरूष आरोपी यांना छापा टाकून पकडले तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स याचे मदतीने त्यांच्या ताब्यातून अंदाने ४,१५,५००/-रू. किंमतीचा ७८.५ ग्रॅम वजनाचा एम.डी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ (ड्रगस्) व इतर १,९७,८२०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुददेमाल जप्त करून, नमुद आरोपीविरुध्द बेकायदेशिररित्या अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगतांना मिळून आले म्हणून मुंबईनाका पोलीस ठाणे येथे ०८/२०२५ एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्हयातील महिला आरोपी पल्लवी गणेश निकुंभ उर्फ सोनाली शिंदे वय ३६ वर्षे, हिचे विरूध्द यापुर्वी इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हा रजि क १२/२०२४ एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पो. उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पो. आयुक्त संदीप मिटके, , यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स याच्या मदतीने वपोनि सुशिला कोल्हे, सपोनि सचिन चौधरी, सपोनि विशाल पाटील, सपोउनि देवकिसन गायकर, सपोउपनि बेंडाळे, सपोउनि संजय ताजणे, पोहवा भारत डंबाळे,पोहवा बळवंत कोल्हे, पोअं अनिरुध्द येवले, पोअं बाळासाहेब नांद्रे, पोअं योगेश सानप, पोअं चंद्रकांत बागडे, पोअं अविनाश फुलपगारे, मपोअं अर्चना भड सर्व नेम. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर, खंडणी विरोधी पथकाचे पोउपनि भोई, सपोउपनि श्रीम जगताप, पोअं भरत राउत, मपोअं सविता कदम तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे पोहवा गायकवाड, पोना ससाने यांनी ही कामगिरी केली आहे.
लवकरच जुडवा पेडलरचा पर्दाफाश