*नांदूर शिंगोटे येथील V P Naik माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात महावितरण चे सहाय्यक अभियंता राम इप्पर यांचे विद्युत सुरक्षेवर व्याख्यान संपन्न*
*नांदूर शिंगोटे येथील V P Naik माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात महावितरण चे सहाय्यक अभियंता राम इप्पर यांचे विद्युत सुरक्षेवर व्याख्यान संपन्न*
नांदूर शिंगोटे प्रतिनिधी
प्रकाश शेळके
मकरसंक्रांतीच्या पार्श्व भूमीवर महावितरण तर्फे विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विजेच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यात येत आहे, याचाच एक भाग म्हणून नांदूर शिंगोटे येथील सहाय्यक अभियंता श्रीराम इप्पर यांनी व्ही पी नाईक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले.
त्यांचे मार्गदर्शनात त्यांनी पतंग उडवताना होणारे अपघात आणि पतंग उडविताना घ्यावयाची काळजी, व विद्युत यंत्रणेबाबत माहिती असे विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले, त्याच बरोबर मागेल त्याला सोलर पंप, रूफ टॉप सोलर कसे फायद्याचे आहे याबद्दल विद्यार्थांना माहिती दिली.
सदर मोहीम ही नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता तथा अधिक्षक अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर साहेब, कार्यकारी अभियंता श्री डोंगरे साहेब, उपकार्यकारी अभियंता श्री हरक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. इलग सर, आव्हाड सर आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते, या मार्गदर्शनाचा शाळा महाविद्यालयातील एकूण 500 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
धातू मिश्रित मांजा नायलॉन मांजा हा अतिशय धोकेदायक आहे तो विजेचा सुवाहक आहे त्यामुळे अपघात होऊ शकतो मांजा अडकून वाहिन्या नादुरुस्त होतात विद्युत पुरवठा खंडित होतो पतंग उडवताना मोकळ्या जागेत व काळजीपूर्वक उडवावा व सणांचा आनंद घ्यावा
श्री.आर एस इप्पर
सहाय्यक अभियंता
महावितरण