आमदाराच्या त्रासामुळे तालुका काँग्रेस अध्यक्षा शीतल महाजन यांचा विषारी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न खाजगी रुग्णालयात उपचार सुरु अभोणा पोलिसात तक्रार दाखल
आमदाराच्या त्रासामुळे तालुका काँग्रेस अध्यक्षा शीतल महाजन यांचा विषारी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न
खाजगी रुग्णालयात उपचार सुरु अभोणा पोलिसात तक्रार दाखल
कळवण प्रतिनिधी
कळवण सुरगाणा मतदार संघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या सततच्या त्रासामुळे कॉग्रेस तालुका अध्यक्षा शीतल महाजन यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त असून या वृत्ताने जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून यासंदर्भात अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि शीतल महाजन यांचे पती ग्रामसवेक असून त्यांना कोणत्या ना कोणत्या खोट्या तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवत असल्यामुळे त्यांची पत्नी शीतल महाजन यांना मानसिक त्रास होत असल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत शीतल महाजन यांनी आमदार नितीन पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे पती ग्रामसेवक यांना खोट्या तक्रारी करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र चौकशीत काहीच आढळेल नाही.त्यानंतरही आमदारांकडून त्रास हा सुरूच होता त्याच त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला आहे.आमदार नितीन पवार आणि त्यांची पत्नी जयश्री पवार यांच्या विरोधात अभोणा पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान सद्या बीड जिल्हातील गुन्हेगारीचे वातावरण चर्चेचा विषय झाला आहे.तेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कळवण मतदार संघात सुरु आहे.कळवण तालुक्यात आमदार नितीन पवार यांच्या विरोधात जनतेने कौल दिल्यामुळे गावागावातील विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे.येत्या दोन दिवसात कळवण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी जनतेने दिला आहे. द आमदारांची दादागिरी, दमबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा आदिवासी नागरिकांनी दिला आहे.
“या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र अभोणा पोलीसानी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे. अभोणा पोलिसांवर आमदार नितीन पवार यांचाच दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल केला जात नाही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
– योगेश गायकवाड बंधू
तक्रारकर्ते
दोन दिवसांत आंदोलन :- दरम्यान सद्या बीड जिल्हाचे गुन्हेगारीचे वातावरण झाले आहे तसेच वातावरण करण्याचा प्रयत्न कळवण मतदार संघात सुरु आहे. कळवण तालुक्यात आमदार नितीन पवार यांच्या विरोधात जनतेने कौल दिल्यामुळे गावागावातील विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे.येत्या दोन दिवसांत कळवण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी जनतेने दिला आहे. दादागिरी दमबाजी आमदाराची खपवून घेणार नाही असा इशारा आदिवासी नागरिकांनी दिला आहे.