क्राईम

प्रस्थापित नेत्यांनी स्वतःची राजकीय भूमिका समाजावर लादू नये; मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी निर्णय, सकल समाज मनोज जरांगे यांच्या सोबत 


प्रस्थापित नेत्यांनी स्वतःची राजकीय भूमिका समाजावर लादू नये;

 

मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी निर्णय, सकल समाज मनोज जरांगे यांच्या सोबत 

 

 

 

 

नाशिक प्रतिनिधी

 

विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्ष किंवा संघटनेत काम करणाऱ्या कुठल्याही समाज बांधवांनी सकल मराठा समाज म्हणून स्वतःची भूमिका अवघ्या समाजावर लादू नये. आपापल्या विचारसरणी प्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता नेता त्याचा व्यक्तिगत राजकीय निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. मात्र तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल, सकल म्हणजे संपूर्ण मराठा समाजाचा तो निर्णय नसेल असा एकमुखी ठराव आज विविध राजकीय पक्ष आणि मराठा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

सकल दोन दिवस नाशिक शहरातील विविध राजकीय पक्षात काम करणाऱ्या मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांनी दोन वेगवेगळ्या बैठका घेऊन स्व पक्षाच्या भूमिकेनुसार आघाडी किंवा युतीच्या उमेदवारांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर केला. या बैठकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या दोन्ही बैठकामधून दिलेला पाठिंबा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या भूमिकेशी विसंगत असल्याने सामान्य सकल समाज मतदान नक्की कुणाला मतदान करायचे, याविषयी संभ्रमित झाला आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत आरक्षण चळवळीत हिरीरीने सहभागी असलेल्या उमेदवारांना पाठिंबा न देता, ओबीसीच्या विचार पिठावरून मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना कसे मतदान करायचे, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळे ही बैठक बोलविण्यात आली होती.

 

*मराठा समाज लोकसंख्येने मोठा असून विविध राजकीय पक्षात विखूरलेला आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या विचारधारेने भारावलेला आहे. कुणी हिंदुत्व वादी, सनातनी तर कुणी पुरोगामी.व्यक्ती स्वातंत्र्याचा अभिनिवेश मानत असतांना त्यांच्या विचारधारेशी समर्पक भूमिका घेण्यास त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण केवळ व्यक्तिगत पातळीवर. सकल समाजाला त्यांचा तो निर्णय कधीच मान्य असणार नाही. यापुढे समाजाच्या जीवावर राजकारण करणाऱ्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी स्वतःची राजकीय भूमिका सकल समाजावर लादण्याचा करंटेपणा करू नये. असा इशारा या बैठकीने दिला आहे.*

Advertisement

 

 

मराठा समाजाचा कोणाला पाठिंबा नाही, विरोध नाही,

 

जो समाजाच्या हिताचा त्याला कौल दया 

 

 

सकल मराठा समाज हा सर्वांभिमुख आहे, सर्व दूर पसरलेला एकसंघ आहे. तो कुठल्याही गटात विभागलेला नाही, मराठा समाजातील अनेक संस्था, संघटना, राजकीय मंडळी, विविध गटात विखूरले असले तरी ज्याला जो उमेदवार समाजाच्या हिताचा त्याला समाज आपापल्या पद्धतीने मत देईल, ते त्याला स्वातंत्र्य आहे,असे एकमुखी निर्णय नाशिकला झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, तत्पुर्वी काल, परवा जे गटाने पाठिंबा दिले गेले, त्यासी सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही असा ठराव यावेळी करण्यात आला,

सकल मराठा समाजाचे आंदोलन कर्ते नाना बच्छावं यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराला अनुसरून मराठा समाज कार्यरत आहे, तीच मराठ्यांची भूमिका आहे, एका गटाने नाशिकमध्ये दिला गेलेला पाठिंबा हा मराठा समाजाचा पाठिंबा म्हणून आम्हांला मान्य नाही, समाजाच्या भूमिका जरांगे पाटिल यांच्या विचाराला बांधील आहे, व नाशिकला सकल मराठा समाजाचा कोणालाही पाठिंबा नाही,विरोध ही नाही, समाज ठरवेल जो समाजाच्या हिताचा,त्याला मतदान करण्यास समाजाला स्वातंत्र्य आहे.

 

यावेळी सकल मराठा समाजाचे नानासाहेब बच्छाव, संजय फडोळ, राम खुर्दळ,शरद लभडे, सचिन वसंत पवार, सचिन थेटे, महेंद्र बेहेरे, यशवंत पिंगळे,राम निकम, सचिन पवार, चंद्रकांत बच्छाव,संदीप कुटे आकाश आहेर, संजय पांगारे, अभिमन्यू डोके, चेतन शेवाळे,गौरव गाजरे, ऍड स्वप्ना राऊत, रोहिणीताई उखाडे संदीप बऱ्हे,शिवाजी शेलार, सचिन शिंदे, सुधाकर चांदवडे, सुरेश सोळंके, प्रशांत वाळुंजे, कुणाल भवर, दीपक दहिकर, गिरीश अहिरे, शांताराम पाटील, प्रतीक पिंगळे, शंतनू पिंगळे,यासह अनेकजण उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *