निशब्द : एम बी बी एस करायचे होते… पण बी ए एम एस नशिबी आले… गुणवत्ता होती पण आरक्षणाने मारले….. प्रदिपच्या मृत्यूची स्क्रिप्ट लिहिणाऱ्या मराठा द्रोही चांडाळ प्रवृत्तींनो… उघडा डोळे वाचा नीट!!!!!
निशब्द : एम बी बी एस करायचे होते… पण बी ए एम एस नशिबी आले…
गुणवत्ता होती पण आरक्षणाने मारले…..
प्रदिपच्या मृत्यूची स्क्रिप्ट लिहिणाऱ्या मराठा द्रोही चांडाळ प्रवृत्तींनो… उघडा डोळे वाचा नीट!!!!!
दुनियादारी विशेष :-
बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातील लोणी शहाजांपुर गावातील एकवीस वर्षाचा तरूण प्रदीप मते… मुळातच हुशार.. कुटुंबाच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र , पण अंगभूत हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर बारावी पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणाचा अर्थ आणि महत्व समजायला लागल्यापासून त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायची तयारी होती. बारावी पर्यंत जीवापाड मेहनत करून गुणवत्ता सिद्ध केली. आणि एम बी बी एस प्रवेशाच्या जीवघेण्या स्पर्धेत स्वतःला झोकून दिले. गुणवत्ता होती, मात्र आरक्षण नव्हते. परिणामी त्याची गुणवत्ता डावलून “इतर” एम बी बी एसला प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले आरक्षणाने गुणवत्तेला “ओव्हेरटेक”केले. खासगी कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा तर लाखों रुपये वर्षाकाठी फी भरली जाईल अशी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाही. आजवरच शिक्षणच कसं तरी पुर्ण केलं. एम बी बी एस साठी लागणाऱ्या लाखोंची फी भरण्यासाठी कुटुंबाला कर्जाच्या खाईत लोटण्याची त्याची मानसिकता नव्हती, अखेर मनावर दगड ठेवून त्याने बी ए एम एसला प्रवेश घेतला. मात्र प्रदिपच स्वाभिमानी मन रमत नव्हते. आरक्षणाच्या विंचवाची नांगी सारखी त्याला दंश करीत होती. त्यातच तो वैफल्यग्रस्त झाला. आणि अखेर त्याने आपली जीवन यात्रा संपवली, आरक्षण हवेचं हे स्टेट्स ठेवून. प्रदीपचे हे स्टेट्स त्या तमाम चांडाळ प्रवृत्तींच्या छाताडावर भुतासारखे नाचत राहील ज्यांनी ज्यांनी प्रदीप सारख्या शेकडो हजारो मराठा तरुणांचे भविष्य घडविणाऱ्या हक्काच्या आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी समाजाचे रक्त पिऊन मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या करूनही अशा असंख्य प्रदीपच्या गुणवत्तेसमोर लाख लाख नोटांच्या राशीला महत्व दिले, ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या तोंडात आलेला आरक्षणाचा घास हिसकावून घेण्यासाठी ओबीसी मराठा संघर्ष पेटविण्याचे निच कुटील कुलटेलाही लाजवील असे राजकारण सुरु केले.
मराठा समाजातील अशा हजारो प्रदीपला आरक्षणाची झळ बसली आहे. प्रत्येकाची आरक्षणाबद्दलची एक स्वतंत्र कथा आहे. ज्यात मराठा विद्यार्थ्यांच्या वाट्याला निराशा आणि दुःखच येते. ह्याच कथेची स्क्रिप्ट बदलण्यासाठी मनोज जरांगे नावाच्या संघर्ष योद्धा्याच्या खांद्याला खांदा लावून सर्व पक्षीय कुटील कुटाळ राजकारण्यांच्या छाताडावर बसून आता आरक्षण मिळवायचेच असा निर्धार संकल्प करून मुंबई पादाक्रांत करण्यासाठी निघाला आहे.