विद्यार्थी आणि मूल्ये :मौजे पास्ते येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून ढवळे महाराजांनी केले विद्यार्थ्यांचे प्रबोधन
विद्यार्थी आणि मूल्ये :मौजे पास्ते येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून ढवळे महाराजांनी केले विद्यार्थ्यांचे प्रबोधन
रश्मी मारवाडी /दुनियादारी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सिन्नर तालुक्यातील मौजे पास्ते येथे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे संचालक उत्तमराव बोडके यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि मूल्ये या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ह. भ. प. शिवाजी महाराज ढवळे हेही उपस्थित होते. ह. भ. प. ढवळे महाराज यांनी मुलांनी कसे वागावे व शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा असल्याचं विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करायला हवे असे आवाहन केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर चकोर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सारिका नागरे यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी गावचे मुकुटमणी सेवानिवृत्त पोलिस सहाय्यक उपायुक्त डी पी आव्हाड तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप , के .व्ही. एन .नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य समन्वयक, प्राध्यापक वर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.