क्राईमताज्या घडामोडी

लासलगावचा तो इन्स्पायर ठग फरार? शेकडो कोटीला चुना, गुंतवणूकदार पुन्हा गंडवले….


लासलगावचा तो इन्स्पायर ठग फरार?

 

शेकडो कोटीला चुना, गुंतवणूकदार पुन्हा गंडवले….

 

नाशिक प्रतिनिधी 

सात वर्षांपूर्वी दाम दुप्पट, स्वस्तात प्लॉट असे अमिष दाखवून करोडोला गंडा घालणाऱ्या ठगाने पुन्हा त्याच लासलगावमधून त्याच ठगाने शेकडो कोटी रुपये घेऊन पोबारा केल्याने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान आपली दुनियादारीच्या सूत्रांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार सदर ठग पळून गेलेला नाही तर ढोकेश्वर पतसंस्थेच्या जुन्या घोटाळ्यात दाखल गुन्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत असल्याने इकडे लासलगावच्या केंद्रीय कार्यालयात त्याची उपस्थितीत दिसत नसल्याने त्याने शेकडो कोटी घेऊन पोबारा केल्याची बोंब समाज माध्यमातून उठली. त्यांनतर लासलगाव आणि परिसरातील गुंतवणूकदारांनी एकत्र येत बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेऊन लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयानुसार हे वृत्त प्रसिद्ध होई पर्यंत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.

 

अपहरण, गोळीबाराची चर्चा :-

एका बाजूला दाम दुप्पटचे अमिष दाखवून संबंधित कंपनीचा संचालक फरार झाल्याची चर्चा व्हायरल झाल्यानंतर या कंपनीशी संबंधित एका महिला कर्मचाऱ्याच्या भावाचे एका स्थानिक गुंडाने अपहरण केल्याची चर्चा आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला किंवा कसे याविषयी कुठलीच खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. दुसऱ्या बाजूला याच कंपनीचे कार्यालयीन कामकाज पाहणारा फरार संचालकाच्या जवळच्या नातेवाईकावर अंग रक्षकांनीच भरवस फाटा ते विंचूर दरम्यान गोळीबार केल्याची चर्चा आहे. या दोन्ही घटनेत संबंधितांचे वाहन संशयितांनी स्वतःच्या ताब्यात ठेवून घेतल्याचीही चर्चा आहे. याविषयी पोलिस ठाण्यात कुठलीही अधिकृत नोंद नसल्याने सदर माध्यम त्याला दुजोरा देत नाही.

 

 

 

 

गेल्या आठ दिवसापासून कंपनीचा मास्टर माईंड अचानक गायब झाला आर्थिक घेवाण चालू होती परंतु देवाण बंद झाली मास्टरमाइंड्सचा मोबाईल बंद असल्याने कोणाचाही त्याच्याशी संपर्क होत नव्हता कंपनीची मॅनेजर असलेली मॅडम गुंतवणूकदारांना रोज वेगवेगळे खोटे कारण सांगत होती अचानक समाज माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आणि गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.

 

लासलगाव मधे दुप्पट पैशाच्या अमीषाने, स्वस्तात प्लॉट आमिषाने हजारो मध्यमवर्गीय गरीब लोकांना करोडोंचा गंडा घालून त्यांना कंगाल केल्याची घटना सात वर्षांपूर्वी घडलेली असून,त्याच गोरगरीब जनतेची फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत लासलगाव सह महाराष्ट्रभर तब्‍बल 5 हजाराहून अधिक नागरिकांची कोटयवधींची माया डबल करण्याच्या हेतूने आमिष दाखवून गोळा करून आज कंपनी कुलप बंद करून पसार झाल्याची चर्चा लासलगाव परिसरात सुरू आहे. दाम दुपटीच्या आशेने लोक पैसे गुंतवतात.परंतु या साखळीचा शेवट काय शेवटी गुंतवणूकदारांची फसवणूक १००% होतेच असे असूनही या कंपनीने फसवणूक केलेल्या लोकांच्या रकमेचा . हा आकडा ३०००कोटींच्‍या घरात असण्‍याची शक्‍यता आहे. स्वस्तात सोने, दोन महिन्यात दाम दुप्पट या शेअरमार्केट ट्रेडिंग अशा युक्त्यांचा वापर करून हा हायटेक गंडा घालण्यात आला आहे

Advertisement

 

पाहिजेत*

नियमित प्रकाशित होत असलेल्या एका दैनिकांसाठी, लाखभर उड्डाणं घेऊ पाहणाऱ्या पोर्टल तसेच यु ट्यूब चॅनेलसाठी, कृषी अनियतकालिकासाठी आणि कोजागिरीपासून नाशिकमधून प्रकाशित होणाऱ्या सायं दैनिकासाठी खालील जागा भरावयाच्या आहेत.

इच्छुक पात्र उमेदवारांनी शेवटी दिलेल्या ई-मेलवर आपले अर्ज पाठवावेत
1) उपसंपादक :2 : बातमी लिहिण्याचा अनुभव, नवीन उमेदवारांना शिकण्याची संधी
2) डिटीपी /पेज सेटर/डिझायनर: स्वतंत्रपणे  पान लावण्याची क्षमता, ग्राफिक्सचे ज्ञान आवश्यक
3) जाहिरात एक्झिकुटीव्ह :5
4) प्रतिनिधी :शहरातील प्रत्येक वार्डात तसेच नाशिक, अहिल्यानगर,धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात….
संपर्क : मार्कंडेय प्रकाशन

 

 

ही कंपनी सुरुवातीला 5000 रुपयांच्या बदल्यात एका महिन्यात 10 हजार रुपये देत होती. लोकांची हाव वाढत गेली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहुन कंपनीने 30 दिवसात 1 लाखावर 2 लाख परतीची योजना काढल्यावर अनेकजण तुटुन पडले. अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .

 

अजब म्हणजे फसवणुक होत असलेल्या अनेक लोकांना ही बोगस कंपनी आहे, एकनाएक दिवस बंद पडेल हे चांगले माहिती आहे . पण सुरुवातीला हमखास मोबदला मिळाल्याने जितके दिवस दामदुप्पट मोबदला घेता येईल अशा प्रयत्नात हे गुंतवणुकदार होते .आपल्याला पैसे मिळतात म्हणून मित्रांना आणि नातेवाईकांना मिळवून देण्यासाठी अनेकांनी आग्रह करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे

“वर्क फॉर होम नावाने बेरोजगार तरुणांची भरती करून पगार व इन्सेटिव्ह आमिषाने अनेक भोळ्या भाबड्या बेरोजगार तरुणांना सहभागी करून घेऊन ग्राहक आणल्यावर मोठे कमिशन देऊन मासिक पगार सुरु केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करुन घेण्याची चढाओढ या पंचक्रोशीत सुरु झाली आहे . गेल्या आठ महिन्यात या स्किममध्ये निफाड तालुक्यात हजारो लोकांनी आपले पैसे गुंतवल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कंपनीने महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी शाखा स्थापन केलेल्या असून अचानक या सर्व शाखा बंद पडल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.”

“कळकळीचे आवाहन :-थोड्या दिवसात दामदुप्पटच्या आमिषाला बळी न पडता आपली आयुष्याची जमापुंजी राष्ट्रीयकृत बँका, आरबीआय ने मान्यता दिलेला आर्थिक संस्था मध्ये गुंतवणूक करावी.आर्थिक फसवणूक करणारी चीट फंड करणारे संचालक व साथीदार एजंट यांच्यावर गुन्हा जरी दाखल केला तरी त्यांच्याकडून पूर्ण रक्कम मिळेल अशी शक्यता फ़ारच कमी असते. शिवाय ती वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रिया असते.म्हणूनच जिथे लालच जास्त तिथे धोका अधिक हे वाक्य नेहमी लक्षात ठेवून आपल्या बचतीची गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे यातच शहाणपण आहे.”

मास्टर माईंड अचानक गायब झाल्यानंतर च्या आठ दिवसाचे कलेक्शन कुणी गडप केले याचीही चर्चा लासलगावात सुरू आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *