कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा विस्तार माळशेज घाटाच्या सावरणे गावापर्यंत करा! मधुकर वाल्हेकर
कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा विस्तार माळशेज घाटाच्या सावरणे गावापर्यंत करा! मधुकर वाल्हेकर
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
बाळासाहेब भालेराव /मुरबाड
सध्या होऊ घातलेला मुरबाड ते कल्याण २८ किलोमीटरचा मार्ग केवळ मुरबाड पर्यंतच न ठेवता त्याचा विस्तार मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले व सह्याद्री पर्वताला खुनवणारे निसर्गरम्य सावरणे गावापर्यंत करा अशी मागणी मुंबई माळशेज नगर रेल्वे प्रवाशी संघाचे अध्यक्ष मधुकर वाल्हेकर यांनी केली आहे ठाणे पुणे आणि अहमदनगर तसेच नाशिक जिल्ह्यालाही कवेत घेणार हा रेल्वे मार्ग भविष्यात महाराष्ट्राच्या विकासाची नांदी ठरणार आहे १९७० पासून केवळ चर्चेच्या गृहात अडकलेला कल्याण अहिल्यानगर( अहमदनगर) हा रेल्वे मार्ग फार आधीच व्हायला हवा होता परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा रेल्वे मार्ग रखडला असून केंद्र सरकारने मुरबाड ते कल्याण असा २८ किलोमीटरचा रेल्वे मार्ग सध्या प्रस्तावित केला असून त्याचा सर्वे झाला आहे कुठल्या अडचणीमुळे हा रेल्वे का रखडला हे कळू शकले नाही तुर्तास प्रलंबित असे चित्र दिसत असून निवडणुकीनंतर या मार्गाचे काम चालू होणे आवश्यक होते हा रेल्वे मार्ग केवळ मुरबाड पर्यंत न थांबवता त्याचा विस्तार मुरबाड शिवळे सरळगाव टोकावडे वैशाखरे मार्गे माळशेज घाट असा व्हायला हवा मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेला आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये विकासाचे वारे येण्यासाठी हा रेल्वे मार्ग संस्थापरीत करण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी विधानसभा निवडणूक नंतर मधुकर वाल्हेकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भालेराव व मुरबाड तालुका अध्यक्ष रमेश घरत दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री व महाराष्ट्रातील खासदारांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे मधुकर वाल्हेकर यांनी सांगितले.
आशिया खंडातील पहिली भारतीय प्रवासी लोकल सुरू करण्याचा मान स्व नाना शंकर शेठ यांना जातो त्या नाना शंकर शेठ यांचा जन्म मुरबाड तालुक्यात झाला परंतु मुरबाडवासीयांच दुर्दैव अजूनही मुरबाड मध्ये रेल्वे धावू शकलेली नाही २८ किलोमीटरची रेल्वे केवळ मुरबाड पर्यंतच प्रस्तावित असून तिचा विस्तार माळशेज घाटापर्यंत करा अशी मागणी ते दिल्ली दरबारी करणार आहेत वेळी चाळीस वर्ष कल्याण ते अहिल्यानगर (अहमदनगर) रेल्वे मार्गासाठी ते सातत्याने आवाज उठवित आहेत अनेक संघटना अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा या रेल्वेमार्गासाठी सह्यांची मोहीम निवेदन मोर्चे आंदोलन यामध्ये विशेषता पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे तरीसुद्धा ही रेल्वे अजून पर्यंत तरी प्रगती च्या काठावर आलेली नाही १९९३ सालात माजी मंत्री मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली रेल्वे परिषद बोलवण्यात आली होती परंतु ती रेल्वे परीक्षेत यशस्वी होऊ शकली नाही अजून पर्यंत मुरबाड करांचे नगरकरांचे स्वप्न हवेतच आहे २०२५ मध्ये तरी मुरबाड रेल्वेचे काम युद्ध पातळीवर सुरू व्हावे यासाठी आम्ही दिल्ली दरबारी जाणार असल्याचे मधुकर वाल्हेकर यांनी बोलताना सांगितले.