गुंड -पुंड, षंड असतात! जेष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांनी जागविल्या पत्रकारितेतील आठवणी चंद्र सूर्यचा अंधाराला फितूर झाले तर…..!!
गुंड -पुंड, षंड असतात!
जेष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांनी जागविल्या पत्रकारितेतील आठवणी
चंद्र सूर्यचा अंधाराला फितूर झाले तर…..!!
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
नुकताच आणीबाणीचा काळ संपून नव्या विचारांच्या सरकारचा कारभार सुरु झाला नेमक्या, त्याच वेळी माझ्या पत्रकारितेची सुरुवात झाली. १९७७ चे साल होते ते.
स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब पोतनीस यांच्या मार्गदर्शनात आणि सोबत गावकरीतून पत्रकारितेचा प्रवास सुरु झाला.तेंव्हाच्या काळात पत्रकारिता करणे एक आव्हान होतं. दळणवळण आणि चलन आजच्या इतकं विकसित नव्हतं. राष्ट्रीय आणि स्थानिक अशा दोन्ही पातळीवर देश अस्तित्वाचा संघर्ष करीत असतांना जनसामान्यांचे प्रश्न व्यवस्थेसमोर मांडून ते सोडविण्याचे आव्हान तत्कालीन पत्रकारितेसमोर होतं. एखाद दुसरा अपवाद वगळता झाडून सारी पत्रकारिता या आव्हानाला सामोरी जात होती. व्यवसाय नव्हे तर व्रत म्हणून पत्रकारिता करायची हेच आमच्या पिढीच्या रोमा रोमात भिनले होते. साधने नाहीत, मैलोन्मैल पायपीट करून वृत्तांकन करायचं आणि संध्याकाळी कार्यालयात येऊन कागदावर उतरून ते छापायला द्यायच. ऊन वारा पाऊस, बारा महिने चोवीस तास हेच चक्र.
नाशिक गावकरी, कोल्हापूर सकाळ, पुणे तरुण भारत आणि १ १९८३ पासून जवळपास २००१ पर्यंत नाशिक मधूनच नव्याने सुरु झालेले रामभूमी अशा विविध नित्य माध्यमातून पत्रकारिता करतांना अनेक अनुभव आले. प्रसंगी जीवावर देखील बेतले. आज आपण मला ज्या अवस्थेत पाहत आहात ती अवस्था देखील अशाच एका कटू अनुभवाची साक्ष देत आहे. असो, दुःखी कष्टी सामान्य माणसाला त्याचे हक्क मिळवून देणारी पत्रकारिता करतांना सत्याच्या वाटेवर चालावे लागले, त्यातून दुखावलेल्या आत्म्यांनी आपले इप्सीत साधले. मी मात्र दुःखी झालो नाही. उलट या प्रवासात याच सत्याच्या वाटेवर पत्रकारिता करणारे आपल्यासारखे असंख्य पत्रकार तोच वसा चालवीत असल्याचे पाहून उर अभिमानाने भरून येतो, आणि ते दिवस आठवत आठवत नवे आयुष्य लाभल्याचा भास होतो. माणूस मारता येतॊ , अधू करता येतो, मात्र त्याने पेरलेले विचार मारता येत नाही हेच वास्तव काही अपवाद सोडले तर आपल्यासारख्या व्रतस्थ पत्रकारांच्या लेखणीतून उमटत आहे. तोच माझा श्वास बनला आहे. हा श्वास असाच फुलत ठेवाल, हीच या पवित्र दिवशी आपल्याकडुन अपेक्षा.
सत्याच्या मार्गावर प्रामाणिक पणे वाटचाल केली तर असत्य कितीही बलदंड असले तरी सत्याला मारू शकत नाही. कारण असत्य आत्मविश्वासाला पारखे असते. असत्याची कास धरणारे, गुंड पुंड षंड असतात, ते प्रामाणिक कर्तृत्वाच्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत, हे पक्के लक्षात ठेवा.
पत्रकारिता ही केवळ एक नोकरी नाही, ती समाजाची सेवा आहे. लोकांना सत्य दाखवणे, प्रश्न विचारणे आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकणे, हे पत्रकाराचं खरं काम आहे.
काही महत्त्वाचे मुद्देः
1. सत्य हे सर्वोच्चः कोणत्याही परिस्थितीत सत्याशी तडजोड करू नका. सत्य सांगण्याची ताकद ही पत्रकारितेचा आत्मा आहे. तुमचं लिखाण हे सत्यावर आधारित असलं पाहिजे. आजच्या काळात माहितीचा वेग वाढला असला तरी तिचं तपासणं हे तुमचं कर्तव्य आहे.
2. निःपक्षपाती राहाः तुम्ही कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक प्रभावाखाली काम करू नका. समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी निःपक्षपातीपणा महत्त्वाचा आहे.
3. तथ्य तपासणीः माझ्या काळात माहिती मिळवणे कठीण होते, पण आता तुमच्याकडे इंटरनेट ww आणि डिजिटल माध्यमे आहेत. याचा योग्य उपयोग करून प्रत्येक गोष्ट तपासा.
4. नैतिक मूल्ये जोपासाः पत्रकारितेत नैतिकतेला फार महत्त्व आहे. कोणताही प्रलोभन किंवा दबाव स्वीकारू नका. लोक तुमच्याकडे सत्यासाठी पाहतात, त्यामुळे त्यांचा विश्वासघात करू नका. तुमच्या शब्दांमध्ये ताकद असते, त्यामुळे ते नेहमी समाजाच्या भल्यासाठी वापरा. नैतिकता हा तुमचा भक्कम पाया असावा.
5. तंत्रज्ञानाचा वापरः बदलत्या काळानुसार पत्रकारितेत अनेक तंत्रज्ञान आले आहेत. या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून तुम्ही तुमचं काम अधिक प्रभावीपणे करू शकता. डिजिटल माध्यमं, सोशल मीडिया यामुळे पत्रकारितेला नवा वेग आणि आव्हानं मिळाली आहेत. पण या माध्यमांचा उपयोग लोकशिक्षण आणि सत्य मांडण्यासाठी करा, अफवा पसरवण्यासाठी नाही.
अनुभव काय सांगतो?
मी बघितलं आहे की पत्रकाराने लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं की समाज बदलतो. पत्रकार हे समाजाच्या विकासाचं महत्त्वाचं साधन आहेत. पण त्यासाठी प्रामाणिकपणा आणि धैर्याची गरज आहे.
आज नव्या पिढीसमोर संधीही आहेत आणि आव्हानंही. तुमच्यावर समाजाला जागरूक करण्याची www जबाबदारी आहे. पत्रकार म्हणून केवळ बातम्या देणं पुरेसं नाही, तर लोकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे ही तुमची भूमिका आहे.
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. तुम्ही जे दाखवाल, त्यावरून समाज आपलं मत बनवतो. त्यामुळे ww सत्य आणि न्यायासाठी तुमची भूमिका नेहमी स्पष्ट आणि ठाम ठेवा.
शेवटी, मी तुम्हाला एकच सांगतोः
“सत्याच्या वाटेवर चालणं सोपं नसतं, पण त्यातूनच खऱ्या पत्रकाराची ओळख होते.”
“तुम्ही पत्रकार आहात, समाजातील बदल घडवून आणण्यासाठी तुमच्या लेखणीला तलवारीइतकी धारदार करा. सत्य आणि निष्ठा याचं संरक्षण करणारे तुम्ही आहात.”
धन्यवाद!
मधुकर बुवा
अकाली, अनैच्छीक निवृत्ती लादलेला एक पत्रकार :संहिता :कुमार कडलग, नाशिक
…. कोण आहेत मधुकर बुवा :
परिचय :-
१९७७ साली नाशिकच्या दै. गावकरीतून आपण पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर १९८१ मध्ये कोल्हापूर सकाळ, १९८३ मध्ये तरुण भारत आणि त्याच वर्षी नाशिकच्या पुण्य भूमीतून सुरु झालेल्या दै. श्री रामभूमी या नित्य वृत्त पत्राचे संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली.१९८३ ते २००१ या दीर्घ काळात त्यांनी नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध गंभीर मुद्द्यांना वाचा फोडली. त्याचे दुष्परिणाम देखील सोसले. त्या आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत. अनेक घटनांना आम्ही स्वतः देखील साक्षीदार आहोत. त्यापैकीच १९८४ साली घडलेली ती पिंपळगाव बसवंतची घटना विसरता येणार नाही. न्यायालयाच्या पवित्र आवारात सुरु असलेली दारू मटणाची पार्टी छायाचित्रासह प्रसिद्ध केली. एकच खळबळ उडाली. एक केस अंगावर घ्यावी लागली.
पुढच्या दोनच वर्षात म्हणजे १९८६-८७ साली पंचायतराज कमिटीचा घोटाळा उघडकीस आणला होता, परिणाम स्वरूप आपल्या विरोधात लोकप्रतिनिधींनी हक्कभंग प्रस्ताव आणला होता. तेंव्हा त्याना विधानसभेत हजर रहावे लागले होते.तिथेही आपली ही बाणेदार पत्रकारिता शरण गेली नाही.पुढच्या काळात देखील अनेक आव्हाने पेलली.
जयवंत सोनवणे नामक एका पत्रकारावर सटाण्यात तात्कालीन नगराध्यक्षांनी हल्ला केला होता, तेंव्हा या मुजोर प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी आपण हल्ल्याइतकाच तिक्ष्ण मारा करणार्या शब्दांची लेखमाला चालवली, त्याही पुढे जाऊन नाशिक शहरातून न भूतो न भविष्यती असा भव्य मोर्चा काढला होता.. आम्ही चुकत नसू तर ग्रामीण भागातील तॊ पहिला आणि एकमेव मोर्चा ठरला. एका पत्रकारावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी एका संपादकाने मोर्चा काढणे हेच मुळी आश्चर्य. आजच्या काळात मोर्चा फार दूरची गोष्ट ,वार्तांकन करताना निर्दोष ,निष्पाप वार्ताहार ,प्रतिनिधींना शिव्यांची लाखोली वाहीली जाते.मारहाण होते तेंव्हा संपादक नावाचे महाशय स्वतःची कातडी वाचविण्यातच हशील मानतात ंतेंव्हा आपली उणिव भासल्याशिवाय रहात नाही.अर्थात आजही काही महानुभव अशा आणिबाणीच्या काळात आपल्या प्रतिनीधीच्या पाठीशी खंबीर उभे राहतात.त्यांना सलामच.पण १९९२ साली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या त्या मुक मोर्चात जिल्हा भरातील सारे पत्रकार सहभागी झाले होतेच.शिवाय सामान्य माणसानेही या मोर्चाल प्रतिसाद दिल्यान त्या काळात पाच हजारांचा मोर्चा काढणारे एकमेव संपादक ठरलात.हा मोर्चा निघु नये म्हणून तत्कालीनजिल्हाधिकारी आणि पो.उपायुक्त मकरंद रानडे यांनी जाचक अटी लादल्या , स्वतः कार्यालयात येऊन विनंती केली.आपण बधला नाहीत.मोर्चा काढला ,यशस्वी केला.पत्रकाराला न्याय मिळवून दिला.ही आहे आपल्या पत्रकारीतेची ताकद,जी आज आम्हाला शोधावी लागते.
याच दरम्यान तत्कालीन उप जिल्हाधिकारी छोट्या छोट्या गोष्टीवरून छळत होते तेव्हाही आपणच हस्तक्षेप करून पत्रकारांना तारले.आपले ते शब्द आजही आमच्या कानात गुणगुणतात.आपण नेहमी म्हणायचे की,बातमी मिळवितांना आपल्या हातून खून झाला तरी घाबरू नका,मी सोडविल.यातील अतिशयोक्ती आणि शब्दाशः अर्थ सोडून द्या .पण बातमीवर आपलं किती प्रेम आहे,तितकच प्रेम आपल्या बातमीदारानेही करावं हा आपला आग्रह लपून रहात नाही.राजकिय विरोधातील बातम्या छापू नयेत म्हणून आपणांस अनेक आर्थिक प्रलोभने मिळाली.धामक्या आल्य,हल्लेही झालेत.तरीही शब्दांना देणारी आपली लेखनी म्यान झाली नाही.आणि हिच शिकवण आम्हालाही दिली.त्याच शिदोरीवर आम्ही आजही धाडसी पत्रकारीता करू शकतो.हे मान्य करण्यास यत्किंचीतही कमीपणा वाटत नाही.
साहेब! संगमनेर मधील पेट्रोल, कळवणचा मका खरेदी विक्रीचा घोटाळा आपण किती गांभिर्याने प्रशासनाच्या वेशीवर टांगला ,त्याचे चित्र जसेच्या तसे डोळ्या समोर ऊभे राहते.अशी खुप उदाहरण आहेत.बहुचर्चित तेलगी घोटाळा हे त्यातलेच एक.श्रेयाच्या साठमारीत कुणी काहीही दावा करोत,पण वृत साप्ताहिक लोकज्योतीत आपल्या मार्गदर्शनात आपल्या टिमने नाशिकरोड आयएसपीत काम करणारा रामपाल नावाचा साधा स्वीपर आणि अंबड लिंक रोडच्या भंगार बाजारात लपवलेले छपाई मशिन शोधण्याचे धाडस दाखवले म्हणूनच या घोटाळ्याला वाचा फुटली आणि अवघा महाराष्ट्र तेलगीच्या मागे धावला.इतकच नाही तर तत्कालीन जिल्हा परिषद निवडणूकीत श्रीगोंदा तालुक्यात नामदेव शिंदे नामक पोलीस निरिक्षकांच्या खूनाची कबर उकरून त्याचे धागे दोरे बड्या नेत्यापर्यंत आहेत हे शोधण्याचे धाडस देखील आपल्याच टिमने दाखवले.
ज्यांनी जग उजळायचे ते चंद्र सुर्यच अंधाराला फितूर झाले तर,क्षितीजावर दाटलेल्या अंधाराचे मळभ दुर करायचे कुणी ?हा प्रश्न आपण नेहमी विचारायचात.आणि इवलीसी ज्योत पेटवून मिणमिणत्या प्रकाशातून वाट शोधण्यास हातभार लावणारी पणती तयार करा असा पर्याय देखील आपणच द्यायचात…साहेब! मिणमिणता प्रकाश देणार्या अशा शेकडो – हजारो पणत्या उभ्या करून इवलीसी ज्योत चेतविण्याचा संकल्प द लँड एम्पायरचे मुख्य प्रवर्तक मंदार वाईकर आणि त्यांच्या सहकार्यानी आज सोडला आहे .दुग्ध शर्करा योग म्हणजे त्या पणत्या समोर आहेत तर व्यवस्थेच्या क्षितिजावर दाटलेले अंधाराचे मळभ दुर करणारे चंद्र सुर्य देखील विचारपिठावर उपस्थित आहेत.हे चंद्र सुर्य पणत्या विझू देणार नाहीत आणि पणत्या या चंद्र सुर्यांना अंधाराशी संगतसोबत करू देणार नाहीत.एव्हढाच शब्द देतो आणि जाता जाता इतकच सांगेन की,
ग्रंथाली प्रकाशनाने – दुनियादारी या आपल्या संपादकिय सदरातून प्रसिध्द झालेल्या लेखमालेचे पुस्तक प्रकाशित केले आहे. आपला तोच वारसा पुढे नेत असतांना आम्ही मुद्रित माध्यमात संधी मिळेल तिथे दुनियादारी लिहीती ठेवली आहे.त्याचाच नवा अवतार म्हणून आपली दुनियादारी हे आणखी एक माध्यम आज आपल्या साक्षीने अनावरीत केलेय.
शब्दांकन :-कुमार कडलग, नाशिक