अहिरेश्वर जगताप यांची मानद प्राणी कल्याण अधिकारी पदी नियुक्ती
अहिरेश्वर जगताप यांची मानद प्राणी कल्याण अधिकारी पदी नियुक्ती
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………………………………..
पुणे : वरवंड (ता. दौंड) येथील गोरक्षक अहिरेश्वर जगताप यांची महाराष्ट्र शासनाच्या मानद पशू कल्याण अधिकारी पदी निवड झाली असून नुकतेच त्यांना याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रमाणत्रानुसार महाराष्ट्र शासनाचे पोलीस विभाग, महानगरपालिका, नगरपालिका अधिकारी व पशु वधगृहाचे अधिकारी आणि इतर सर्व संबंधित विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचित करण्यात येते की मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी या समितीत प्रदान केलेल्या अधिकारानुसार सदरच्या मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यास, प्राणी कल्याण कायद्याचे संनियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. गोरक्षक तथा प्राणीमित्र अहिरेश्वर जगन्नाथ जगताप यांची २९ डिसेंबर २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेली ११ वर्षापासून संघर्ष करत निस्वार्थी गोसेवा बरोबर संकटात सापडलेल्या अन्य जखमी जीवांना वाचविल्यामुळे त्यांना ही संधी मिळालेली आहे. याबद्दल जगताप यांनी शासनाचे हृदयापासुन धन्यवाद मानले. मिळालेल्या संधीचे सोने करत दुप्पटीने मुक्या जीवांच्या सेवेचे कार्य करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. मुंबई मंत्रालयातून कार्ड घेत सर्व श्रेय आई गोमातेचे व सहकारी मित्र यांचे आहे असे जगताप यांनी सांगितले. त्यांना देशभरातून विविध संघटना व गोप्रेमी कडून शुभेच्छा मिळाल्या.