क्राईम

जेष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांच्या हृद्य सन्मानाने सभागृह हेलावले  द लँड एम्पायर – इंडो रोड सेफ्टी फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा यथार्थ सन्मान 


जेष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांच्या हृद्य सन्मानाने सभागृह हेलावले 

 

द लँड एम्पायर – इंडो रोड सेफ्टी फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा यथार्थ सन्मान 

 

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

मराठी संस्कृती जतन करा 

…………………………………………………………………………….

 

नाशिक प्रतिनिधी

सत्याच्या मार्गावर प्रामाणिक पणे वाटचाल केली तर असत्य कितीही बलदंड असले तरी सत्याला मारू शकत नाही. कारण असत्य आत्मविश्वासाला पारखे असते. असत्याची कास धरणारे, गुंड पुंड, षंड असतात, ते प्रामाणिक कर्तृत्वाच्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत, हे पक्के लक्षात ठेवा.असा सल्ला जेष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात उपस्थित पत्रकारांना दिला.

द लँड एम्पायर आणि रोड सेफ्टी फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेहान सर्कल येथील करी लिव्हज मध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि फ्रेम द वर्क स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

साधारण वीस वर्षांपूर्वी एका अपघाताने अपंगत्व आल्याने घरातच राहणारे मधुकर बुवा प्रदीर्घ कालावधी नंतर घराबाहेर पडले होते. मधुकर बुवा यांचा प्रथमच असा आगळा वेगळा सन्मान झाल्याने ते स्वतः आणि कुटुंबीय भारावून गेले होते. इतकेच नाही तर कित्येक वर्षानंतर धगधगत्या लेखणीचा अधिकारी असलेल्या या व्रतस्थ पत्रकाराचा चेहरा याची देही याची डोळा नजरेस पडल्याने आणि त्यांच्या मनातील लिखित भावना कुमार कडलग यांनी यांनी वाचून दाखवल्या तेंव्हा सोहळ्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे शिष्य पत्रकारांसोबत नव्या पिढीतील पत्रकारांचेही डोळे पाणावले होते.

पत्रकारिता ही केवळ एक नोकरी नाही, ती समाजाची सेवा आहे. लोकांना सत्य दाखवणे, प्रश्न विचारणे आणि समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकणे, हे पत्रकाराचं खरं काम आहे.अशा भावना मधुकर बुवा यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रास्ताविक करतांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा इंडो रोड सेफ्टी फॉउंडेशनचे संस्थापक संजय सोनवणे यांनी

पत्रकार दिनाच्या निमित्ताने द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक व्यवस्था आणि समस्या या विषयावर “फ्रेम द वर्क” या स्पर्धेचे आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट केला.पत्रकारांच्या माध्यमातून वाहतूक आणि अपघात याविषयी समाजात जागृती व्हावी, तसेच पत्रकारांच्या प्रतिभाचाही यथार्थ सन्मान व्हावा हा यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

 

भारतात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. एका बाजूला दर्जेदार प्रशस्त रस्ते, अत्याधुनिक सुरक्षा किट सह तितक्याच तोलामोलाच्या महागड्या गाड्या, आणि प्रशिक्षित चालक असतांना अपघातांची संख्या कमी होणे अपेक्षित असतांना वाढत आहे. या विरोधाभासाचे निरीक्षण केल्यानंतर जन जागृतीचा अभाव हे कारण निदर्शनास आले.अपघातातील सतत वाढत जाणारी मृतांची संख्या लक्षात घेता, ही उणीव दूर करण्याचे काम फक्त पत्रकार करू शकतात, म्हणून समाजाचा एक घटक म्हणून ही जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात निवृत्त उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी व्यक्त केली.

 

 

 

जेष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांचा हृद्य सन्मान :-

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे तब्बल सत्तावीस वर्ष जनाभिमुख पत्रकारिता केलेले जेष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांचा विशेष सन्मान केला. पुणेरी पगडी, फेटा, कृतज्ञतेचा ताम्रपट देऊन द लँड एम्पायरचे मुख्य प्रवर्तक मंदार वाईकर,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष,इंडो रोड सेफ्टी फाउंडेशनचे संस्थापक संजय सोनवणे,जीएसटी उपायुक्त राजाभाऊ गायकवाड, निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, शहर वाहतूक निरीक्षक देविदास वांगळे यांच्या हस्ते पत्रकारितेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी फ्रेम द वर्क या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करून त्यांना रोख पुरस्कार आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.

 

आम्ही पत्रकारांचे देणेकरी:मंदार वाईकर

पत्रकारिता हा व्यवसाय नाही तर ती सेवा आहे. या कर्तव्यावर सेवारत असतांना पत्रकारांना अनेक आवाहनाला सामोरे जावे लागते. तळहातावर जीव घेऊन पत्रकारिता करतांना पत्रकाराला त्याच्या सुरक्षेची हमी देणे आपल्यासारख्या समाजातील जबाबदार घटकांचे कर्तव्य आहे. त्याची जाणीव झाल्याने पत्रकारितेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ब्रॉडकास्टच्या माध्यमातून विविध प्रकारच्या माध्यमातील पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण,सोशल मीडिया प्रशिक्षण, आणि प्रत्येक पत्रकाराला पाच ते दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा संकल्प सोडल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक द लँड एम्पायरचे मुख्य प्रवर्तक मंदार वाईकर यांनी सांगितले.

 

हे आहेत पुरस्काराचे मानकरी :-

प्रथम पारितोषिक: 11000 रुपये प्रशांत खरोटे लोकमत,११०००/-, स्मृती चिन्ह

दुतीय पारितोषिक : केशव मते, सकाळ 7500 /-, स्मृती चिन्ह

तृतीय पारितोषिक:अनिल केदारे, भारत माझा न्यूज 5000/- स्मृती चिन्ह

उत्तेजनार्थ एक: यतीश भानू, 2500//,स्मृती चिन्ह

उत्तेजनार्थ दोन :खुशाल पाटील,2500 /-स्मृती चिन्ह

 

सोशल मीडिया न्यूज चॅनलच्या लोगोचे अनावरण :

द लँड एम्पायरच्या प्रशासकीय संचालक नम्रता वेदिया यांनी नाशिक सुपरफास्ट न्यूज,रोखठोक न्यूज,नासिक टुडे न्यूज या तीन सोशल मीडिया न्यूज चॅनलची माहिती दिली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या चॅनलच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

पत्रकार अमर सोळंके नम्रता वेदिया, पत्रकार कुमार कडलग, स्नेहा राठोड, रश्मी मारवाडी, ऋषिकेश विसपुते संदीप चव्हाण आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्कृष्ट संयोजन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *