रामकृष्ण हरी, आता वाजेल तुतारी! पंचवटीत दुमदुमला गणेश गिते यांच्या विकास कामाचा जयघोष
रामकृष्ण हरी, आता वाजेल तुतारी!
पंचवटीत दुमदुमला गणेश गिते यांच्या विकास कामाचा जयघोष
नाशिक :प्रतिनिधी
रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी… आता आवाज घुमणार तुतारीचा, पाहिजे गणेश भाऊ गिते आमदार… आपले मत नाशिकच्या विकासासाठी… अशा जयघोषात पंचवटीचा परिसर दुमदुमला होता. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश भाऊ बबन गिते यांच्या विजयाच्या निश्चिती बाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
पेठ रोडवर वाहतुकीची वर्दळ खुप मोठया प्रमाणावर असल्यामुळे नेहमी खराब रस्त्यामुळे पेठ रोडवरील नागरीक त्रस्त होते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या ठिकाणी काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला. गणेशभाऊ गिते यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात पेठ रोडच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेत, त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. गणेशभाऊ गिते यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात पंचवटीमध्ये अनेक विकास कामे केली आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. यावेळी अनेक ठिकाणी माता-भगिनींकडून त्यांचे औक्षण केले गेले, ज्येष्ठांकडून त्यांना विजयाचे आशीर्वाद भेटले, विविध सामाजिक संस्था गणेश गीते यांना पाठिंबा दिला आहे. तर रिपब्लिक पार्टी (धर्मनिरपेक्ष) यांनी देखील पाठिंबा दिला आहे. पंचवटीमध्ये विविध विकासकामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासपुरुष अशी उपाधी असलेल्या गणेश भाऊ गिते यांना निवडून देण्यासाठी पंचवटीकरांनी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे.
पंचवटी या भागामध्ये आरोग्य, विद्युत व्यवस्था पुरविणे तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचवटी भागामध्ये विकास कामे होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी गणेश भाऊ गिते यांचा कामाचा अवाका आणि अनुभव खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पंचवटीमध्ये विविध कामे होण्यासाठी ते सर्व प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या विधानसभेमध्ये त्यांना निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्वत्र त्यांचा प्रचार करत आहे. हा प्रचार दौरा सकाळी सुरू झाला. पंचवटी येथील पवित्र इंद्रकुंड देवस्थानातील गणपती बाप्पा आणि रुद्र हनुमानांचे दर्शन घेऊन प्रचारास सुरूवात केली.
याठिकाणी झाला दौरा
या दौऱ्यात इंद्रकुंड, दिंडोरी नाका परिसर, श्रीराम नगर, लोक सहकार नगर, चित्रकूट, महाराष्ट्र को.ऑप. सोसायटी, कालिका नगर, तीन मंदिर परिसर, गोंड वाडी, राहुल वाडी, फुलेनगर, तीन पुतळे, म्हसोबा नगर, हरि ओम नगर, पाटावरून, वज्रेश्वरी नगर, तारवाला नगर परिसर, लामखेडे मळा परिसर या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.