क्राईम

कुछ भी हो सकता है!


 

कुछ भी हो सकता है!

 

२०तारखेला मतदान,२३ तारखेला मतमोजणी..

तुम्हाला काय वाटतं? या तारखा उगीच ठरल्यात का?

त्यामागे निश्चित नियोजन आहे.सोची समझी रणनीती आहे.

२६ तारखेला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.. तोपर्यंत नवं सरकार सत्तेवर आलं नाही तर विधानसभा बरखास्त होईल..राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.

बाजी एकदा भाजपच्या हाती गेली की, मग काहीही होऊ शकतं.. म्हणजे सत्ता संपादनासाठी भाजप काहीही करू शकते..साम, दाम, दंड, भेद नीती..

नैतिकता, संविधान..हे भाजपने केव्हाच कोळून प्यायलं आहे..

योजना कशी आहे बघा:-

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तरी त्या त्यांच्यातही एवढे मतभेद आणि अंतर्विरोध आहेत की, दोन दिवसात सारं सुरळीत होऊन आघाडी सत्तेवर येईल असं वाटत नाही.

मुख्य मुद्दा मुख्यमंत्रीपदाचा आहे..

ठाकरे गटाला असं वाटत होतं की, आघाडीनं उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं..

तसं झालं नाही..

काँग्रेस नेत्यांनी वारंवार जाहीर केलंय की, “ज्यांच्या अधिक जागा त्यांचा मुख्यमंत्री”हे सूत्र ठाकरे गटाला मान्य नाही..

म्हणजे, घोडं इथं अडणार. भाजपला हे ठाऊक असल्यानं निवडणूक तारखा ठरवताना आघाडीच्या नेत्यांना वाटाघाटीसाठी जास्त वेळ मिळणार नाही याची काळजी भाजपनं घेतलेली आहे.

विषय 26 तारखेपर्यंत मिटला नाही की,

राष्ट्रपती राजवट लागू होणार.

म्हणजे सारी बाजी भाजपच्या हाती..

मग सत्ता, पैसा आणि इडी, सीबीआयच्या माध्यमातून काहीही करणं भाजपला अवघड नाही..

अपक्ष आमदारांना विकत घेतलं जाऊ शकतं.पक्ष फोडले जाऊ शकतात

किंवा

सारा पक्षच आपल्या बाजुनं ओढला जाऊ शकतो..

अर्थात काहीही म्हणजे काहीही घडू शकतं..

आघाडीच्या नेत्यांना म्हणूनच सावध राहावं लागेल..

मतभेदांची जाहीर वाच्यता टाळावी लागेल,

गोदी मिडिया टपून आहे.

तो केवळ आघाडीतील वादच दाखवत राहतो..

भाजप आघाडीतही मोठे मतभेद आहेत पण ते दाखवले जात नाहीत..

भाजपसाठी सत्ता हेच साध्य आहे.

सत्ता मिळविण्यासाठी त्यांच्या लेखी अनैतिक असं काहीच नाही..

आणखी एक..

समोर पराभव दिसतोय म्हणून तो शांत बसत नाही.. शेवटपर्यंत चिवटपर्यत लढत राहतो. हरियाणात दिसलं हे..

भाजपच्या कुटनीती बरोबरच त्यांची बलस्थानं लक्षात घेऊनच आघाडीला आपली व्यूहरचना करावी लागेल.एकदा बाजी हातून निसटल्या नंतर कोर्ट कचेरी यांना काही अर्थ नसेल..

पुढील पाच वर्षे नुसतीच तारीख पे तारीख पडत राहील..

परिस्थिती आघाडीला पोषक आहे.

तुमच्या गाफीलपणाचा, किंवा मतभेदांचा फायदा भाजपला होणार नाही याची काळजी घ्यावीच लागेल.. .

Advertisement

तुम्हाला काय वाटतं? या तारखा उगीच ठरल्या?

त्यामागं नियोजन आहे, सोची समझी रणनीती आहे..

२६ तारखेला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.. तोपर्यंत नवं सरकार सत्तेवर आलं नाही तर विधानसभा बरखास्त होईल..

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल..

बाजी एकदा भाजपच्या हाती गेली की, मग काहीही होऊ शकतं.. म्हणजे सत्ता संपादनासाठी भाजप काहीही करू शकते..

साम, दाम, दंड, भेद नीती..

नैतिकता, संविधान..?

हे भाजपने केव्हाच कोळून प्यालं आहे..

योजना कशी आहे बघा.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तरी त्याच्यातही एवढे मतभेद आणि अंतर्विरोध आहेत की, दोन दिवसात सारं सुरळीत होऊन आघाडी सत्तेवर येईल असं नाही..

मुख्य मुद्दा मुख्यमंत्रीपदाचा आहे..

ठाकरे गटाला असं वाटत होतं की, आघाडीनं उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं.

तसं झालं नाही..

काँग्रेस नेत्यांनी वारंवार जाहीर केलंय की, “ज्यांच्या अधिक जागा त्यांचा मुख्यमंत्री”

हे सूत्र ठाकरे गटाला मान्य नाही.

म्हणजे, घोडं इथं अडणार. भाजपला हे ठाऊक असल्यानं निवडणूक तारखा ठरवताना आघाडीच्या नेत्यांना वाटाघाटीसाठी जास्त वेळ मिळणार नाही याची काळजी भाजपनं घेतलेली आहे.सत्ता स्थापनेचा

विषय २६ तारखेपर्यंत मिटला नाही की,

राष्ट्रपती राजवट लागू होणार..

म्हणजे सारी बाजी भाजपच्या हाती..

मग सत्ता, पैसा आणि इडी, सीबीआयच्या माध्यमातून काहीही करणं भाजपला अवघड नाही..

अपक्ष आमदारांना विकत घेतलं जाऊ शकतं

पक्ष फोडले जाऊ शकतात

किंवा

सारा पक्षच आपल्या बाजुनं ओढला जाऊ शकतो..

अर्थात काहीही म्हणजे काहीही घडू शकतं.

आघाडीच्या नेत्यांना म्हणूनच सावध राहावं लागेल..

मतभेदांची जाहीर वाच्यता टाळावी लागेल,

गोदी मिडिया टपून आहे..

तो केवळ आघाडीतील वादच दाखवत राहतो..

भाजपच्या महायुती तही मोठे मतभेद आहेत पण ते दाखवले जात नाहीत.

भाजपसाठी सत्ता हेच साध्य आहे..

सत्ता मिळविण्यासाठी त्यांच्या लेखी अनैतिक असं काहीच नाही..

आणखी एक..

समोर पराभव दिसतोय म्हणून तो शांत बसत नाही.. शेवटपर्यंत चिवटपर्यत लढत राहतो. हरियाणात दिसलं हे.

भाजपच्या कुटनीती बरोबरच त्यांची बलस्थानं लक्षात घेऊनच आघाडीला आपली व्यूहरचना करावी लागेल.. एकदा बाजी हातून निसटल्या नंतर कोर्ट कचेरी यांना काही अर्थ नसेल..

पुढील पाच वर्षे नुसतीच तारीख पे तारीख पडत राहील..

परिस्थिती आघाडीला पोषक आहे.

तुमचा गाफीलपणाचा, किंवा मतभेदांचा फायदा भाजपला अथवा शिवसेना शिंदे गटाला होणार नाही, याची काळजी महाविकास आघाडीला घ्यावी लागेल.

 

– कुबेर जाधव,विठेवाडीकर

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *