क्राईम

लोकशाहीसाठी समर्पण: १ महिन्याच्या बाळासह आई मतदानासाठी केंद्रावर “ती” माऊली ठरली प्रेरणादायी..!


लोकशाहीसाठी समर्पण:

१ महिन्याच्या बाळासह आई मतदानासाठी केंद्रावर

“ती” माऊली ठरली प्रेरणादायी..!

 

नाशिक प्रतिनिधी

जिल्ह्यात सर्वच विधानसभेत मतदारांनी मतदानामध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला प्रशासनाच्या जनजागृती नंतर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये देखील कमालीचा उत्साह संचारलेला पाहायला मिळाला तसेच शहरात देखील नागरिकांनी मोठ्या उत्साहपूर्वक वातावरणात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले याच धरतीवर चक्क एका माय माऊलीने आपल्या एक महिन्याच्या बाळासह मतदानासाठी केंद्रावर हजेरी लावली आणि ती माऊली इतर नागरिकांसाठी आदर्श ठरली..

Advertisement

नाशिक येथील एका मतदान केंद्रावर एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना घडली. लोकशाहीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आई केवळ आपल्या एक महिन्याच्या लेकरासह मतदान केंद्रावर हजर झाली. एक महिन्याच्या बाळाला घेऊन आलेली ही आई,महिलांसाठी आणि सर्वसामान्य मतदारांसाठी आदर्श ठरली..

 

*कर्मचारीही भारावले*

तिने मताचा हक्क बजावण्यासाठी जबाबदारी आणि समर्पण दाखवून दिले. एका हातात एक महिन्याचे बाळ आणि दुसऱ्या हातात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी असलेली तयारी पाहून, उपस्थित कर्मचारी आणि मतदार भारावून गेले. या आईने मतदारांना संदेश दिला की प्रत्येक मत मूल्यवान आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मतदान करणे आपले कर्तव्य आहे. अशा समर्पित मतदारांच्या प्रयत्नांमुळेच लोकशाही मजबूत होते. या माऊलीने मतदानासाठी जनजागृतीचे उदाहरण उभे केले असून,तिच्या या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होते.फक्त आता ज्यांच्यासाठी या माऊलीने हे समर्पण दाखवले, त्याचे उपकार ‘त्यांनी’ तितक्याच जबाबदारीने सरकारच्या माध्यमातून जाणायला हवेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *