मतदारांना हक्कापासून रोखणाऱ्या युवकाला घेतले ताब्यात ; प्रतिक्रिया :-हा राष्ट्रद्रोहच! सजाही याच गुन्ह्याची व्हावी
मतदारांना हक्कापासून रोखणाऱ्या युवकाला घेतले ताब्यात ;
प्रतिक्रिया :-हा राष्ट्रद्रोहच! सजाही याच गुन्ह्याची व्हावी
नाशिक प्रतिनिधी
मुस्लिम बहुल भागातील मतदारांना मतदानाच्या मूलभूत हक्कापासून रोखण्याचे बेकायदेशीर काम करणाऱ्या एका युवकास इंदिरा नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवसैनिकांनी या लोकशाही द्रोह करणाऱ्या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने गृह विभागापेक्षा नागरिकांच्या गुप्त बातमीदारांचे जाळे विस्तृत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. इतकेच नाही तर हा करंटेपणा करणाऱ्या प्रवृत्ती लोकशाहीशी म्हणजेच देशाशी द्रोह करीत असल्याचीही चर्चा असून कर्तृत्वावर विश्वास नसलेले राजकीय पक्षाचे उमेदवार अशा वाम, राष्ट्र द्रोही मार्गाचा अवलंब करतात,अशी मंडळी लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीला सामोरे का जातात अशाही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पारतंत्र्याच्या गुलाम गिरीत अडकवणाऱ्या साखळ्या तोडून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात क्रांतिकारांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांच्या त्यागातून फुललेल्या लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर मोठ मोठे अभियान राबविले जाते. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. तोच सामान्य जनतेचा अधिकार हिसकावून घेणे हा राष्ट्रद्रोहच आहे. घटनाकरांचा, लोकशाहीचा आणि पर्यायाने राष्ट्राचा आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने कुठलाही राजकीय अभिनिवेश, राजकीय पक्षांचा दबाव झुगारून या देशाच्या गुन्हेगाराला लोकशाहीशी म्हणजेच देशाशी द्रोह केल्याची तितकीच गंभीर सजा द्यायला हवी. अशा कटात सहभागी असणाऱ्या अन्य प्रवृत्तीही हुडकून त्यांनाही कटातील सहभागी आरोपी करावे अशी मागणी केली आहे.