क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

खळबळ :कळवणच्या लिंगामा गावातील विहिरीत आढळले दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह 


खळबळ :कळवणच्या लिंगामा गावातील विहिरीत आढळले दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह 

 

कळवण प्रतिनिधी

 

कळवण तालुक्यातील लिंगामा या गावाजवळील विहीरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत समजलेले वृत्त असे की, अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिंगामा या दुर्गम आदिवासी गावालगत काल सोळा ते सतरा वयोगटातील दोन मुलींचे मृतदेह गावालगतच्या विहिरीत तरंगत असल्याचे गावांतील काही जणांनी पहिले. त्यांनी त्वरित गावातील पोलीसपाटील आणि अन्य ग्रामपंचायत पदाधिकारींना ही बाब लक्षात आणून दिली.त्यानुसार अभोणा पोलीस स्टेशनला घटनेची वर्दी देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रसाळ, कॉन्स्टेबल शौर्य, पवार हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोघा मुलींचे शव विहिरीतून बाहेर काढले.

Advertisement

दोघा मुलींची ओळख पटली असून त्यांची नावे अनुक्रमे माधुरी गोकूळ मोरे (17) रा. लिंगामे आणि गीतांजली अल्पेश उखंडे (16) रा. घोडांबे, ता. सुरगाणा अशी आहेत. दोघींचे मृतदेह उत्तरीय तपासणी साठी अभोणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच या दोघींच्या मृत्यूचे कारण समजणार आहे. अभोणा पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रसाळ पुढील तपास करत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *