प्रत्येक मंगळवारी पोलिसांचा अभ्यागत कक्ष; मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखडयाची अंमलबजावणी
प्रत्येक मंगळवारी पोलिसांचा अभ्यागत कक्ष;
मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखडयाची अंमलबजावणी
नाशिक प्रतिनिधी
१०० दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दर मंगळवारी सकाळी १०.३० ते १४.०० वाजे दरम्यान अभ्यागत कक्ष उपक्रम सुरु करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ दिनांक २५ एप्रिल पासून होत आहे.
“क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ०७/०१/२०२५ रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालीका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख् कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे (Video Conferencing), उप मुख्यमंत्र (नगरविकास, गृहनिर्माण), उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) व मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत संबोधीत केले. यावेळी आगामी १०० दिवसांमध्ये पुढील मुदयांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
१) संकेतस्थळ (Website) २) सुकर जीवनमान (Ease of Living) ३) स्वच्छता (Cleanliness ४) जनतेच्या तक्रारींचे निवारण (Grievance Redressal) ५) कार्यालयातील सोयी व सुवि (Amenities at work place) ६) गुंतवणुक प्रसार (Investment Promotion) ७) क्षेत्री कार्यालयांना भेटी (Field Visits) इत्यांदी मुदयांवर नागरीकांकरीता कृती आराखडा तयार करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री यांच्या सप्तसुत्री कार्यक्रमा अंतर्गत पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयात दर मंगळवारी सकाळी १०.३० ते १४.०० वाजे दरम्यान नागरीकांना अभ्यागत कक्षात भेटुन आपल्या तक्रारी व अडचणीं निवारणासाठी पोलीसांचा अभ्यागत कक्ष हा उपक्रम चालु करण्यात आलेला असुन दिनांक २५/०३/२०२५ रोजी सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर दिवशी नागरीकांना भेटी करीता अपॉइंटमेंट / राखीव वेळ घेण्याची आवश्यकता नाही. नम् उपक्रमाच्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर तसेच सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहा. पोली आयुक्त, तसेच सर्व पो. स्टे. / शाखा प्रभारी अधिकारी नागरीकांच्या भेटी करीता त्यांचे कार्यालयाती अभ्यागत कक्षात उपस्थित राहणार आहेत. अभ्यागत कक्षात नागरीक वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या अडचणी, समस्या, तक्रारी ऐकुण घेऊन नागरीकांच्या तक्रारी समजुन घेऊन त्यांच्या अडचणी व समस्यांची दखल घेवुन निराकरण करणार आहेत.
पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली नागरीकांसाठी राबविण्यात येत असलेल्या पोलीसांच्या अभ्यागत कक्ष (लोकशाही दिन) उपक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहुन आपल् तक्रारींचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात पोलिस आयुक्तांनी केले आहे.



