करियर डेव्हलपमेंट टिप्स:स्वतःला कसे विकसित कराल…..! Focus on progress, not perfection!! चॅप्टर १ : स्मार्ट बना….. BEING SMART
करियर डेव्हलपमेंट टिप्स:स्वतःला कसे विकसित कराल…..!
Focus on progress, not perfection!!
चॅप्टर १ : स्मार्ट बना….. BEING SMART
आपल्या आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी आगळे वेगळे करण्याची इच्छा असते. लहानपणापासुन उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याची धडपड असते. यात मोजकेच काही लोक यशस्वी होतात. अनेकांच्या पदरी निराशा येते. त्या निराशेतून काही मार्ग काढून पुन्हा उभारी घेतात.झालेल्या चुका शोधून त्या दुरुस्त करतात. आणि एका टप्प्यावर हवं ते पदरात पाडून घेतात. तर काही निराशेतच संपून जातात. असं का घडतं? यशस्वी आणि अपयशी व्यक्तीत नक्की कुठला फरक असतो.
आपण अनेक व्यक्तींच्या भाषणातून, चर्चेतून एक वाक्य नक्की ऐकले असेल. प्रत्येक यशस्वी माणूस वेगळे काहीच करीत नाही, तर त्याची पद्धत फक्त वेगळी असते. तीच वेगळी पद्धत सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत.
SMART हा शब्द आपण सर्वांनी ऐकला आहे. नेहमीच ऐकतो. त्याचा अर्थ ही आपल्याला माहित आहे. बस.. त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणेच आपण आपले काम करायचे आहे. एव्हढ्या एका ओळीचा अर्थ समजून घेतला आणि तसे काम केले तरी आपण यशाच्या मार्गांवर वाटचाल करण्यास सुरुवात करू शकतो. मात्र त्या SMART या शब्दाच्या प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट अर्थ आहे. तो अर्थ, त्या अक्षराने तयार होणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्या पद्धतीने आपल्या उद्धीष्टांवर काम केले तर स्वप्न पूर्ती दूर नाही.
Set clear goal :-
स्पष्ट उद्दिष्टे सेट करा: आपले सामर्थ्य म्हणजे क्षमता ओळखा.SMART:S-Specific विशिष्ट
M-Measurable मोजण्यायोग्य
A-Achievable साध्य करण्यायोग्य
R-Relevant संबंधित
T-Timebound कालबद्ध
………………….. उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी तुमचे सामर्थ्य, आवड आणि मूल्ये ओळखा.
………सतत शिका: उद्योगाच्या ट्रेंडशी अद्ययावत रहा आणि अभ्यासक्रम, कार्यशाळा आणि परिषदांद्वारे नवीन कौशल्ये आत्मसात करा.
…….नेटवर्क*: तुमच्या क्षेत्रातील व्यावसायिकांशी संबंध निर्माण करा आणि अर्थपूर्ण संभाषणांमध्ये गुंतून रहा.
………गणनात्मक जोखीम घ्या*: तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि नवीन आव्हाने स्वीकारा.
……अभिप्राय शोधा: रचनात्मक अभिप्राय विचारा, आणि तुमचा दृष्टिकोन समायोजित करण्यासाठी त्याचा वापर करा.
……..स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या: निरोगी काम-जीवन संतुलन राखा आणि तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
…..अनुकूल राहा: बदलासाठी खुले म्हणजे तत्पर रहा, आणि आवश्यक असेल तेव्हा मुख्यत्वे तो बदल स्वीकारून स्वतः बदलण्यास तयार व्हा.
.,……एक मार्गदर्शक शोधा: अनुभवी व्यक्तीकडून शिका आणि मौल्यवान अंतर्दृष्टी मिळवा.
………वैयक्तिक ब्रँड तयार करा: प्रासंगीक उपस्थिती दर्शवा म्हणजे प्रसंगावधान, हजरजबाबी व्हा. आणि तुमचे कौशल्य प्रदर्शित करा.
…. नेटके,व्यवस्थित रहा*: तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करा आणि कामांना प्राधान्य द्या.
लक्षात ठेवा, करिअरचा विकास हा आयुष्यभराचा प्रवास आहे. प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, परिपूर्णतेवर नाही! Focus on progress, not perfection!