क्राईमताज्या घडामोडी

सीमावर्ती भागातुन गुटख्याची तस्करी करणारे पुरवठादार ग्रामीण पोलीसांचे जाळयात*


*सीमावर्ती भागातुन गुटख्याची तस्करी करणारे पुरवठादार ग्रामीण पोलीसांचे जाळयात*

नाशिक प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई सुरू आहे.

 

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पेठ तालुक्यातील पिठुदीनाका तसेच दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सुरत महामार्गावर गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारे पिकअप व इनोव्हा वाहनावर छापे टाकून सुमारे १४ लाख रूपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त करून कारवाई केली होती. सदर गुन्हयांमध्ये वाहनांवरील चालकांना अटक करून त्यांचेकडे चौकशी केली असता, गुजरात राज्याचे सीमावर्ती भागातुन नाशिक जिल्हयात गुटख्याची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरील गुन्हयांचे तपासात गुजरात राज्यातुन गुटख्याची अवैधरित्या बेकायदेशीरित्या कुठलीही बिल व जी.एस.टी. पावती न देता, पुरवठा करणारे किशोर गणेशाराम माळी, वय २१, रा. चिरंजीवी हॉस्पिटल जवळ, पहाडी रोड, नानापोंडा, ता. कपराडा, जि. वलसाड, राज्य गुजरात तसेच उमेश वालाराम चौधरी, वय ३३, रा. सुतारपाडा, ता. कपराडा, जि. वलसाड, राज्य गुजरात यांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

 

यातील आरोपींना अनुक्रमे पेठ पो.स्टे. गुरनं ६२/२०२४ भादवि कलम ३२८ व दिंडोरी पो.स्टे. गुरनं २०१/२०२४ भादवि कलम ३२८ या गुन्हयांमध्ये अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी हे गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून नाशिक सह इतर कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करीत होते, तसेच सदर गुटखा कोण खरेदी करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशिने तपास करीत आहे. जिल्हयात परराज्यातुन येणारे अवैध गुटख्याचे नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांची पथके सत्वर कारवाई करत असून गुटखा तस्करीचे पाळेमुळे खोदण्यास पोलीसांना मदत होणार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोलीस अंमलदार किशोर खराटे, प्रविण सानप, गिरीष बागुल, सुधाकर बागुल, उदय पाठक, शिवाजी ठोंबरे, विश्वनाथ काकड, सागर काकड, मेघराज जाधव, मनोज सानप, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, विनोद टिळे यांचे पथकाने सदरची कारवाई केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *