शिर्डी लोकसभा मतदारसंघ महिलेचा उत्कर्ष डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार का?
उत्कार्त्षा रुपवातेंच्या उमेदवारीने वंचितने दिली जिल्ह्यात महिलेस प्रथम संधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघ महिलेचा उत्कर्ष डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार का?
तिरंगी लढतीने हमकास बदलणार शिर्डीचे राजकीय समीकरण
हिवरगाव पावसा प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत रुपवतेंनी पक्षप्रवेश केला.अकोल्यातल्या कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला.यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिर्डीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदत्वाचा राजीनामा दिला.शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रुपवते नाराज होत्या.त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारीही नाराज होते. रुपवतेंनी काँग्रेसला राजीनामा दिल्याने शिर्डीत काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. उत्कर्षा रुपवतेंनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढणार आहे.
उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात तर दिवंगत नेते प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या आहेत. त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नीकटवर्तीय मानल्या जातात.शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची होती आणि उत्कर्षा रूपवते काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही होत्या, मात्र शिवसेना ठाकरे गटाला जागा सोडल्याने त्या नाराज होत्या.
रूपवतेंनी वंचित कडून उमेदवारी मिळाल्याने शिर्डीत तिरंगी लढत होणार आहे.केद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारी नाकारली तसेच प्रस्थापित राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना बौध्द समाजाला डावलल्याने समाजात मोठी नाराजी आहे. शिर्डी मतदार संघातील आजी – माजी खासदार यांच्यावर मतदार नाराज आहे. अशा परिस्थितीत रूपवतेंनी वंचित कडून उमेदवारी मिळाल्याने शिर्डीतील राजकीय समीकरण बिघडणार आहे.
१९५२ च्या निवडणुकी पासून आतापर्यंत पुरुषच खासदार झाले आहेत.महिलेला एकही राजकीय पक्षाने संधी दिली नाही.३६ लाखाहून अधिक महिला मतदारांची संख्या आहे परंतु त्यांना लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी राजकीय पक्षांनी दिली नाही. महिलांचे मतदान मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांना पाहिजे परंतु उमेदवारी देताना महिलांना डावलले जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.अशा परिस्थितीत उत्कार्त्षा रुपवाते यांना वंचितने उमेदवारीने देऊन जिल्ह्यातून महिलेस प्रथम खासदार होण्याची संधी दिली आहे.बदलत्या राजकीय समीकरणामुळे उत्कार्त्षा रुपवाते यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडण्याची दाट शक्यात निर्माण झाली आहे.