राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एमपीडीए अंतर्गत जिल्ह्यात पहिलीच कारवाई
हातभट्टी दारू विक्रेत्यावर गुन्हे दाखल करून स्थानबद्ध ;
:-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एमपीडीए अंतर्गत जिल्ह्यात पहिलीच कारवाई
नाशिक प्रतिनिधी
नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून mpda अंतर्गत जिल्ह्यात पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत एका व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी योगेश सावखेडकर यांनी दिली आहे.
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समुळ उच्चाटन करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून मोहीम राबवली होती. त्या अनुषंगाने वाल्मीक नगर पंचवटी नासिक या भागात हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातीलच महावीर अरुण कौलकर वाघाडी याच्यावर mpda नुसार कारवाई करण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्थान बद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार महावीर अरुण कौलकर यास नासिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर यापुढेही mpda अंतर्गत स्थानबद्धतीची कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे. सदर कारवाईसाठी वीरेंद्र वाघ राहुल जगताप मायकल पंडित यांनी सहभाग घेतला आहे. सदर कारवाईबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सावखेडकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.