शिर्डी मतदार संघात लोकांना तेच तेच चेहरे आणि मुद्दे ऐकून कंटाळा आलाय : उत्कर्षा रुपवते
शिर्डी मतदार संघात लोकांना तेच तेच चेहरे आणि मुद्दे ऐकून कंटाळा आलाय : उत्कर्षा रुपवते
उत्कर्षा रुपवते यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
शिर्डी (प्रतिनिधी )-
शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोकांना तेच तेच चेहरे,आणी मुद्दे ऐकून कंटाळा आला आहे.लोकसभा मतदार संघातील भुमिकन्या म्हणून सर्वच मतदार आणी राजकीय नेते माझ्या बाजूने विचार करतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी शिर्डीत व्यक्त केला.
दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातील भुमिकन्या उत्कर्षा रुपवते यांनी कॉग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असल्याचे त्यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत जाहीर केले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,गौतम पगारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी त्यांनी म्हटले की, आमच्या घराण्याचा तिन पिढ्या कॉग्रेसशी संबध राहिला होता.कॉग्रेसमध्ये संघर्ष करुनही काही उपयोग झाला नाही.मी देखील गेली पंधरा ते सोळा वर्षे पक्षात सक्रिय सहभाग घेऊन कामकाज केले.राजकिय ,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कामकाजाच्या जोरावर पक्षाकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत सातत्याने मागणी केली.मात्र मला न्याय मिळाला नाही.त्यामुळे वेगळा निर्णय घेताना भावनिक झाले.परंतू जिथे गेले ते देखील माझेच घर आहे.आमचे श्रध्दास्थान आहे.मला पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षासाठी काम करायला हिरवा कंदील दाखवला आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दोन्हीही उमेदवार लोकांना नकोय.
निळवंडे सोडून दुसरे विषय त्यांच्याकडे नाहीत.जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीत उभी राहाणार आहे.एक उच्चशिक्षित महिला उमेदवार म्हणून मला सर्वच मतदार स्विकारतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार का या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, अकोला मतदारसंघात त्याचदिवशी अर्ज दाखल करायचा असल्याने त्यांची शक्यता कमी वाटते मात्र वंचीत बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.मतदार संघातील माझा जाहिरनामा लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले.