ओझरच्या जनशांती धामात श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
ओझरच्या जनशांती धामात श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
ओझर : प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी निर्माण केलेल्या ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जय श्रीरामच्या गजरात अभिषेक-पूजन, नामजप करत प्रसाद वाटप करण्यात आला.
जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपिठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि अथक प्रयत्नातून साकार झालेल्या देवभूमी जनशांती धाम येथील श्रीरामद दरबार मंदिरात ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात आश्रमीय संत हरिहरानंदगिरीजी महाराज, ब्रह्मचारी ऋग्वेदानंद महाराज यांच्या हस्ते अभिषेक-पूजन संपन्न झाले.नामजप, महाआरती यावेळी संपन्न झाली. राम भक्तांच्या वतीने देखील विधिवत पूजन संपन्न झाले. राम नाम जप, महाआरती करण्यात आली. टाळ-मृदुंगाचा गजर करत सुमधुर भजन यावेळी संपन्न झाले.पहाटे ब्रम्हमुहुर्तावर नित्य नियम विधी,ध्यान,प्राणायाम व श्री राम जय राम जय जय राम असा नामजप करण्यात आला. यावेळी जनशांती धामाचे विश्वस्त ज्ञानेश्वर भुसे,बाळासाहेब गटकळ,पत्रकार व विश्वस्त अमर आढाव, महाव्यवस्थापक ब्रह्मचारी ब्रह्मानंदजी महाराज, धामाचे मुख्यापुजारी महेशगुरु शिवपुरी,सार्थक गुरु शिवपुरी, बालप्रवचनकार शिवदास महाराज,आश्रमीय निरीक्षक के.टी काशीद,प्रचार प्रमुख केशव जाधव, सोमनाथ कोल्हे,केदु कुंभार्डे,गणेश क्षीरसागर,विक्रम गोडसे,बाळासाहेब गोडसे, गोकुळ सूर्यवंशी, किशोर क्षीरसागर, ज्ञानेश्वर शेजवळ, किरण शेळके,ओम जाधव, योगेश्वर काकडे, अमोल वाघ, रवी बोहाड सौ रत्ना शेजवळ, अलका साळुंखे, बेबी गोकुळ, जया शिंदे, लीलावती पगार, वैशाली निफाडे,मनश्री निफाडे, अर्चना जाधव, शहाबाई जाधव, लक्ष्मीबाई जाचर यांसह आश्रमिय संत,सेवेकरी व भाविक उपस्थित होते.यावेळी शिवदास महाराज यांनी श्रीराम महिमा यावेळी उपस्थितांना सांगितला.