हनुमान जयंती उत्सवाचा वाद :-भाविकांची दिशाभूल थांबवा; अंजनेरी ग्रामपंचायतचे शासनाला निवेदन
हनुमान जयंती उत्सवाचा वाद :-भाविकांची दिशाभूल थांबवा; अंजनेरी ग्रामपंचायतचे शासनाला निवेदन
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
काही मंडळींकडून भाविकांची दिशाभूल होईल असे नियोजन करून हनुमान जयंती यात्रा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप अंजनेरी ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शासनाने सत्य वस्तुस्थिती जाणून हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अंजनेरीच्या सरपंच जिजाबाई लांडे यांनी ही मागणी केली.
अध्यक्ष हनुमान जन्म संस्था नाशिक नवीन सीबीएस या संस्थेने अंजनेरी ग्रामपंचायतचे सदस्य अथवा गावकरी यांची कुठलीही परवानगी न घेता हनुमान जन्म स्थान संस्था स्थापन केली. सदर स्थापन केलेली संस्था ही खाजगी आहे. सदर संस्थेच्या नावास व बोधचिन्हास ग्रामपंचायतने जोरदार विरोध केला असून त्या कृतिविरुद्ध कायदेशीर कार्यवाहीचे नियोजन सुरू केले आहे.
अंजनेरी गडावर चैत्र पौर्णिमा 23 एप्रिल हनुमान जयंती जन्मोत्सव साजरा करणे,यात्रा नियोजन करणे हे सर्व काम शेकडो वर्षापासून पारंपारिक पद्धतीने अंजनेरी ग्रामपंचायत करत आहे.
असे असताना वरील बाहेरील संस्थेने 23 एप्रिल रोजी अंजनेरी गडावर हनुमान जन्माचा उत्सव आयोजित केला आहे. अंजनेरीच्या ग्रामस्थांना विश्वासात न घेता संस्थेचे बोर्ड देखील लावले आहेत.
अंजनेरी गड व गाव यांच्याशी दुरूनही संबंध नाही अशी संस्था येथे वर्चस्व प्रस्थापित करीत आहेही संस्था .भाविकांची दिशाभूल करत असल्याने अंजनेरी पंचक्रोशीतून विरोध होऊ लागला आहे.
महाआरती करण्याला अंजनेरी ग्रामस्थांचा ग्रांमपंचायतचा विरोध नाही पण हनुमान जन्म स्थान समितीचे नाव वापरून नियोजन करीत आहे.
वरील संस्था हनुमान जयंती साजरा करण्याचा अंजनेरी ग्रामपंचायत गावकऱ्यांचा हजारो वर्षाची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सदस्यांचा आहे.
या पत्रकार परिषदेला उपसरपंच अनिता चव्हाण माजी उपाध्यक्ष व वन समिती अध्यक्ष पंडित चव्हाण उपाध्यक्ष दिलीप चव्हाण कार्यकर्ते अरुण शिंदे भाऊसाहेब लांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तहसीदार पोलीस यंत्रणाव वनखाते यांना निवेदन देण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात येणार आहे अंजनेरी करांचा हक्क वरील संस्था हिरावून कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याने अंजनेरी करांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अंजनेरी ग्रामपंचायत व 35 वार्षा पासून हनुमान जन्मस्थान विकास समिती तसेच महंत अशोक बाबा अंजनेरी गडावर कार्यरत असतात.
वरील संस्थेला देखील कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा देण्यात आला.