लाईफ केअर कार्डीयाक सेंटर तर्फे मोफत हृदय रोग निदान शिबीर
लाईफ केअर कार्डीयाक सेंटर तर्फे मोफत हृदय रोग निदान शिबीर
नाशिक :प्रतिनिधी
धकाधकीच्या जीवनात वाढत जाणारे हृदय विकार लक्षात घेता लेखा नगर, सिडको येथील लाईफ केअर कार्डीयाक सेंटर तर्फे 30 एप्रील 2024 पर्यंत मोफत हृदयरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाईफ केअर हॉस्पिटल चे संचालक डॉ. उमेश मराठे व हृदयविकार तज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी दिली.
या शिबिरामध्ये डॉक्टरांचा सल्ला, 2डी इको, ट्रेस टेस्ट अँजिओग्राफी संपूर्णपणे विनामुल्य करण्यात येणार आहेत.
ज्या रुग्णांना वारंवार छातीत दुखणे, पाय सुजणे, जीव घाबरा होणे, रक्तदाब कमी – अधिक होणे, धाप लागणे, खांद्याला किंवा हाताला वेदना होणे अशा प्रकारची लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी मो. 9235669716/ 17 किंवा (0253) 6716666 संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.