एकविराच्या वतीने बचत गटाच्या 150 महिलांना पेढा बनवण्याचे प्रशिक्षण पेढा उद्योगातून महिलांना रोजगाराची संधी . डॉ. जयश्रीताई थोरात
एकविराच्या वतीने बचत गटाच्या 150 महिलांना पेढा बनवण्याचे प्रशिक्षण
पेढा उद्योगातून महिलांना रोजगाराची संधी . डॉ. जयश्रीताई थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी)–
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सातत्याने महिला सक्षमीकरणाकडे व महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन विविध उपक्रम राबवले असून संगमनेर तालुक्यातील महिला बचत गटामधील150 महिलांना संगमनेर तालुका दूध संघामार्फत पेढा बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
एकविरा फाउंडेशन व राजहंस दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध शाळा येथे 150 महिलांना पेढा बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आली यावेळी संचालक विलास कवडे ,संतोष मांडेकर ,कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी, सुरभी मोरे, कविता पानसरे, स्वाती राऊत ,दिपाली वर्पे, शिला करंजेकर, शितल उगलमुगले, राणी वाजे ,सुनिता कांदळकर, शीला पंजाबी, कल्पना दिघे, स्वाती गुंजाळ आदी महिला उपस्थित होत्या
महिला सबलीकरण व सक्षमीकरण करणे हा एकविरा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश असून महिला व युवतींना घरगुती पदार्थ बनवण्याचा प्रशिक्षण दर शनिवारी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून बचत गटातील महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश असून खाद्यपदार्थ कसे बनवावे याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येत असते
यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाले की. ग्रामीण व शहरी भागातील महिलांमध्ये अनेक कलागुण असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी एकविरा फाउंडेशन फाउंडेशन तर्फे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बचत गटाचे मोठे नेटवर्क तयार असून बचत गटातील महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात असतो. तसेच नव्याने घरगुती पदार्थ बनवणे व त्याचे मार्केटिंग कसे करावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते .यामधून महिलांना स्वयंरोजगार मिळण्यास संधी उपलब्ध होणार आहे. मोठ्या शहरातून घरगुती पदार्थाला मोठी मागणी असून आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून महिलांनी उत्पादित केलेले घरगुती पदार्थ विकले जाणार आहे. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत होऊन ग्रामीण भागातील महिला अधिकाधिक सक्षम करण्याबरोबर त्यांच्या आरोग्य चांगले राहील . विविध उपक्रमांमधून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा व उपक्रमाचा लाभ घ्यावा.असेही त्या म्हणाल्या.
यावेळी दूध संघ मार्फत पेढा विभागाने महिलांना पेढा बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
चौकट.
महिला पेढा उद्योगातून कोटी चा टर्नओव्हर करू शकते– डॉ. जयश्रीताई थोरात
सुवर्णा पानसे या हिवरगाव पावसा येथील महिला असून पेढा उद्योगातून वर्षाकाठी एक कोटीचा टर्नओव्हर करू शकते त्यांचा आदर्श घेऊन पेढा बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करून कुटुंबाला सक्षम करण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले..