ताज्या घडामोडीसामाजिक

हनुमान जन्मस्थानी, हनुमान जयंती निमित्त विश्वातील सर्वात मोठा महाआरती सोहळा 


याची देही, याची डोळा: 

 

 

हनुमान जन्मस्थानी, हनुमान जयंती निमित्त विश्वातील सर्वात मोठा महाआरती सोहळा 

 

नाशिक प्रतिनिधी 

प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत, त्र्यंबकेश्वर येथील, अंजनेरी पर्वतावर, हनुमंतरायाचा जन्मस्थानी दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने मनोवांछित फळ प्राप्त करण्यासाठी दर्शन घेतात.

 

यंदाही सालाबाद प्रमाणे, हनुमान जयंतीचा सोहळा पार पडणार असून, यावेळी नाशिक मधील तसेच महाराष्ट्रातील हनुमान भक्तांनी, साधुसंत महंत आखाड्‌यांचे प्रमुख यांनी भारतातीलच नव्हे तर विश्वातील, सर्वात मोठा महाआरतीचा सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मस्थळ अंजनेरी पर्वतावरआयोजित केलेला आहे. या महाआरती सोहळ्यास त्र्यंबकेश्वर मधील समस्त गावांचा सहभाग आहे. यंदाच्या 2024 सालामध्ये भारत भूमीवर अयोध्येच्या राम मंदिरामुळे रामराज्य अवतरलेले आहे आणि या रामराज्यात श्रीराम भक्त हनुमान यांचे जन्मस्थान सुख सुविधांपासून वंचित राहिलेले आहे. त्यामुळे अयोध्येचा राम मंदिराच्या धर्तीवर, अंजनेरी पर्वताचा तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास व्हावा या पवित्र उद्देशाने हनुमान जन्मस्थान संस्था लाखो हनुमान भक्तांच्या मदतीने, अविरतपणे हनुमंत रायाचे तीर्थक्षेत्र निर्माणकरिता मागील बारा वर्षापासून कार्य करीत आहे. दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 9: 45 मिनिटांनी महाआरतीचा सोहळा हनुमान भक्तांनी ठेवलेला असून, त्यामध्ये भक्त परिवार साधू संत महंत तसेच राजकीय व सामाजिक प्रतिष्ठीत व्यक्ती सामील होणार आहे.

Advertisement

हनुमान जयंती निमित्त दी. २३-४-२०२४ रोजी अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वरयेथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची रूपरेषा येणेप्रमाणे

१. पहाटे पाच वाजता साधू महंतांच्या हातुन महायज्ञ प्रारंभ २. दोन लाख भाविकांना हनुमान चालीसा वाटप ३. ध्वजारोहण अंजनेरी

४. सकाळी ९:४५ वाजता हनुमान भक्तांच्या उपस्थितीत साधू महंतांच्या हातून महाआरती सोहळा प्रारंभः • मारुती स्तोत्र *हनुमान महाआरती *हनुमान चालीसा ५. साधु महंत यांना भगवे वस्त्रदान *हनुमान बिजमंत्र पठण ६. साधुमहंत यांना भोजनदान ७. भक्तांसाठी महाप्रसाद…

महाआरती सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी, मोफत पिण्याच्या पाण्याची व प्राथमिक औषधोपचार व्यवस्था केलेली आहे. तसेच अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखावे म्हणून, स्थानिक गावकरी व स्वयंसेवक यांच्या मार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. हिंदू राष्ट्राची शक्तीची आराध्य देवता, हनुमंत रामाच्या जन्मस्थानी अंजनेरी पर्वतावर लाखोंच्या संख्येने महाआरती सोहळ्यात सहभागी होवुन आशिर्वादीत व्हावे असे आवाहन श्री महंत सोमश्वरानंद महाराज, श्री दिगंबर अनी आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री,महंत भक्तिचरणदास महाराज, महंत अनिकेतशास्री महाराज, महंत श्रीनाथ महाराज, उत्तर महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आण्णा पाटील, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल, धर्मविर गजु घोडके, हनुमान जन्मस्थान संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, अँड प्रविण साळवे आदींनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *