सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांचे सर्व शाळेत चक्रधर स्वामींची जयंती साजरी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांचे सर्व शाळेत चक्रधर स्वामींची जयंती साजरी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
सिन्नर प्रतिनिधी
दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी निघालेल्या परिपत्रकानुसार सर्व जिल्हा परिषद शाळेत, तसेच माध्यमिक शाळेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जयंती साजरी करावी अशा आशयाचे निवेदन बारागाव पिंप्री येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांना दिले आहे.यावेळी उपसंचालक उदय देवरे हेही उपस्थित होते. या निवेदनामध्ये असे म्हटले की नुकतेच महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानुसार सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन (जयंती) शासकिय कार्यालय, शाळा, महाविदयालयांमध्ये सर्वत्र साजरी करण्यात यावी तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा लावण्यात यावी. या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविण्यात आली आहे.