महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक तर्फे आयोजन* *सिडको येथील पूर्णाकृती पुतळा जवळ भव्य कार्यक्रमाचे आयोजन*
*हिंदुकुलसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४८४ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक*
*महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक तर्फे आयोजन*
*सिडको येथील पूर्णाकृती पुतळा जवळ भव्य कार्यक्रमाचे आयोजन*
*विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार कार्यक्रम*
नाशिक :
महापराक्रमी हिंदुकुलसूर्य वीर शिरोमणी, नरव्याघ्र भारताचे वीरपुत्र महाराणा प्रतापसिंह यांची ४८४ व्या जयंती अखिल भारतात साजरी होणार असुन अशा शुर सेनानीचं स्मरण करणे हे सर्व हिंदुस्थानवासीयांचे परम कर्तव्य ठरते, असा राष्ट्रपुरुष जेव्हा आपल्या भारतात जन्माला येतो, आपल्या पराक्रमाची साक्ष देऊन आपले नाव राष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी झळाळत ठेवतो अशा वीरांग्रणी सेनानीची जयंती साजरी करणे हे आपले परमकर्तव्य आहे. महाराणा प्रतापसिंह यांचे नाव नजरेसमोर आले की त्यांची हळदीच्या घाटातील लढाई आठवल्याशिवाय राहत नाही. युध्दामध्ये अतूलनीय शौर्य गाजवलेल्या महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्याकरीता आखिल भारतवासीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या हिंदू तिथीनुसार येत्या रविवार दि. ९ जून २०२४ रोजी नाशिक येथे महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती, नाशिक तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
शहरातील विविध भागातील संस्था महाराणा प्रताप उन्नती मंडळ, महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, हिंदू एकता आंदोलन पक्ष, महाराणा उद्योजक लॉबी, महाराणा प्रताप सेवा संस्था, राणा की सेना, शिवराणा मित्र मंडळ तसेच क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था, राजपूत बेलदार समाज, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ व सर्व महाराणा प्रताप प्रेमी संस्था व बांधवांच्या वतीने जयंती निमित्त सकाळी महाराणाप्रताप चौकात व नंतर सिडको, सातपूर, मुंबई नाका, द्वारका, उपनगर, रविवार कारंजा, भद्रकाली, पंचवटी आदी ठिकाणी दिवस भर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी रविवार दि.९ जुन २०२४ स. ६.०० वाजता रविवार कारंजा येथे दुग्धाभिषेक व सकाळी ९.०० वा. राणाप्रताप चौक, सिडको येथील सुर्यतेज महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. तर सायंकाळी मिरवणुक / शोभायात्रा बिडी भालेकर मैदान, शालीमार, नाशिक येथून दुपारी ५.०० वा. निघेल तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहमित्र परिवारासह अत्यंत पारंपारीक पोशाखात मिरवणुकी प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
*महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक २०२४ कार्यकारणी पुढील प्रमाणे*
अध्यक्ष : डॉ. हेमंत विजयसिंग मगर
उपाध्यक्ष : विजयसिंग पुनमसिंग राजपुत, किरणसिंह विक्रमसिंह राजपुत, प्रेमसिंग राजपुत
सचिव : करणसिंह रामसिंह बावरी, दिनेशसिंह गिरासे, प्रेमसिंग शिंदे
खजीनदार: उमेश जयसिंग पवार
सहखजीनदार : निलेशसिंग राजुसिंग बायस
मिरवणूक प्रमुख : बापूसिंग कुमारसिंग पाटील
प्रसिद्धी प्रमुख : डॉ. महेंद्रसिंग साळुंके
*कार्यकारणी सदस्य*
भावेशसिंह त्र्यंबकसिंह परदेशी, सुमेरसिंग राजपुत, श्री. सुनिलनाना राजपुत, अशोक (अण्णा) राजपुत, भरतसिंह सांळुखे, अतुल दि. पाटील, विकास राजपुत, संतोष साळुंके, योगेंद्रसिंग जमादार, धनसिंग राजपुत, नवल पवार, धनसिंह बजरंगसिंह परदेशी, कुणालसिंह गुलाबसिंह राजपुत व सोमनाथ तवरसिंह परदेशी
*पुतळा नियोजन समिती*
नाना जाधव, योगेंद्र राजपुत, रविंद्रसिंग पाटील, सचिन राजपुत, मनिष परदेशी व गजबसिंग राजपुत
*माजी अध्यक्ष जयंती उत्सव समिती*
श्री. जगतसिंह जाधव (२००४-०६), श्री. जयप्रकाश गिरासे (२००७), श्री. नारायणसिंह पाटील (२००८), श्री. दिलीपसिंह गिरासे (२००९), श्री. राजेंद्रसिंह चौहाण (२०१०), श्री. सुरेंद्र पाटील (२०११), श्री. मिलिंद राजपुत (२०१२-१३), श्री. अॅड. प्रल्हाद बापुजी पवार (२०१४), श्री. सी.बी. गिरासे (२०१५), श्री. रामसिंह तुळशीराम बावरी (२०१६), श्री. सुनिलसिंह परेदशी (२०१७), श्री. राजेंद्र पाटील (२०१८), सौ. देवयानीताई पाटील (२०१९), श्री. भारतसिंग परदेशी (२०२०), श्री. धर्मासिंग साळुंके (२०२१), श्री. रत्नदिप शिसोदिया (२०२२), श्री. विरेंद्रसिंग टिळे (२०२३)
*सल्लागार समिती*
श्री. जयदिप पवार (अध्यक्ष- महाराणा प्रताप उन्नती मंडळ, नाशिक), श्री. मिर्लीद राजपुत (अध्यक्ष-महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ, नाशिक), श्री. राजेंद्रसिंग चव्हाण (राष्ट्रीय उपाध्यक्ष अ.भा. क्षत्रिय महासभा), श्री. रामसिंह बावरी (अध्यक्ष – हिंदू एकता आंदोलन पक्ष / अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ), श्री. रामसिंग राजपुत (वरिष्ठ प्रभारी, श्री राष्ट्रीय राजपुत करणीसेना), श्री. किरणसिंह राजपुत (अध्यक्ष, महाराणा उद्योजक लॉबी), श्री. वाल्मिक राजपुत (अध्यक्ष राणा की सेना, नाशिक)
🙏🏻