निवडणुका ऑक्टोंबर मध्ये न घेता नोव्हेंबर मध्ये घ्यावी.. नामदेव कोतवाल
विधानसभा निवडणुकीत तरी मतदारांची गैरसोय टाळावी,
म. निवडणूक आयोगास निवेदन
निवडणुका ऑक्टोंबर मध्ये न घेता नोव्हेंबर मध्ये घ्यावी.. नामदेव कोतवाल
सिन्नर.
रणरणत्या उन्हात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या..मे महिन्यातील ४५ डिग्री तापमानात प्रचंड ऊष्माघातात झालेल्या निवडणुका पहाता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या आॅक्टोबर हिट मध्ये न घेता नोव्हेंबर मध्ये घेण्यात याव्या.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.
ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत तापमान हे ४२ ते ४५ डिग्री पर्यंत पोहोचले होते..ऊष्णतेने अंगाची लाही – लाही करणारी लोकसभेची निवडणूक झाली.
मे महिन्यात तापमान अत्युच्च पातळीवर नेहमीअसते.हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती.तथापी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका दिवाळीपूर्वी म्हणजे आॅक्टोबर मध्ये निवडणूक आयोग घेण्याच्या विचारात असल्याचे समजते.
परंतु निवडणूक आयोगाने हवामान लक्षात घेऊन आॅक्टोबर मध्ये न घेता विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर मध्ये घेतल्यास सोयीचे होणार आहे..असे मत कोतवाल यांनी व्यक्त करून आॅक्टोबर हिट हि आरोग्यासाठी अतिशय घातक अपायकारक असते..तसेच शेतीची कापणी हंगाम व मुलांच्या सहामाही परीक्षा या आॅक्टोबर मध्ये असतात.याकडे श्री कोतवाल यांनी लक्ष वेधले आहे.
लोकसभेच्या निवडणुकात प्रचार करतांना देशभरात व महाराष्ट्रात उष्माघाताने अनेकांचा जीव गेला आहे.. फक्त विदर्भात व मराठवाड्यात मे महिन्यात ऊष्माघाताने ११६ नागरीकांचा मृत्यु झाल्याची नोंद आहे.हि परिस्थिती पहाता निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील सामाजिक संस्थानी व पर्यावरण वादी विचारांच्या संघटनांनी निवडणूक आयोग व महाराष्ट्र सरकारला निवडणुका कुठल्या महिन्यात घ्याव्यात.. याबाबत कळवले पाहिजे..तसेच एक महिना निवडणुका पुढे घेतल्यास
फारसं वावगं ठरणार नाही.त्यामुळे निवडणुक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आॅक्टोबर हिट ची पार्श्वभूमी लक्षात घेता मतदारांच्या मागणीबाबत संवेदनशील असले पाहिजे..अशी अपेक्षा श्री कोतवाल यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
या मागणीचे निवेदन त्यांनी मा.मुख्यमंत्री सो. व महाराष्ट्र निवडणुक आयोगाचे आयुक्त यु.पी.मदान यांना यांना ईमेल द्वारे पाठवले आहे.