माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मातोश्री गी.दे. पाटील विद्यालयाचे नेत्रदीपक यश
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मातोश्री गी.दे. पाटील विद्यालयाचे नेत्रदीपक यश
संस्थेच्यावतीने १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
नाशिक-प्रतिनिधी
ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता ८ वीतील १९ विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा-२०२४ मध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील व उपाध्यक्ष संतू पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष संतू पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे, सेवानिवृत्त लिपिक बाळासाहेब चव्हाण,खांडबहाले,ज्येष्ठ शिक्षक संजय पवार आदि उपस्थित होते.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेले १९ विद्यार्थी पुढीलप्रमाणे १) रितेश खांडबहाले १६२ गुण,२) श्रद्धा चौधरी १६०गुण,३) अनुष्का विष्णू वाघ १५८गुण,४) ईश्वरी लोणी १५६गुण,५) साईराम व्यवहारे १५६गुण ६) रिया पाटील १५६गुण,७) वेदांत खांडबहाले १५२गुण,८) रवीना गाडरी १५०गुण,९) आर्यन संदीप साळवे १४८गुण,१०) भाग्यश्री खांडबहाले १४६गुण,११) अश्विनी खांडबहाले १४६गुण,१२) त्रिकाया साळवे १४४गुण,१३) अक्षदा साळवे १४४गुण,१४) साहिल बेझेकर १४०गुण,१५) ज्योती दिवे १३८गुण,१६) कीर्ती साळवे १३४गुण, १७) कार्तिकी ढिकले १३२गुण,१८) प्रज्ञा साळवे १३०गुण,१९) श्रावणी खांडबहाले १२४ गुण मिळवून यश संपादन केले आहे असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी अभिनंदन केले.संस्थेचे उपाध्यक्ष संतू पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी कुमारी अनुष्का वाघ या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करत गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी उपशिक्षिका दिपाली वाडीले यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे,सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांना संजय पवार,बाळासाहेब सोनवणे, संजय गायकवाड,सुरेखा भामरे, दिपाली वाडीले,अश्विनी चौरे, खंडू लांबे,दिलीप खांडबहाले, विलास येवले यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांसह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी मानले.
फोटो कॅप्शन:-
महिरवणी येथील गी.दे. पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, उपाध्यक्ष संतू पाटील, मुख्याध्यापक अशोक भदाणे, बाळासाहेब चव्हाण आदिंसह शिक्षक वृंद.