सिन्नर नगर परिषदे तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम
सिन्नर नगर परिषदे तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम
सिन्नर:
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
त्या अनुषंगाने सिन्नर नगरपरिषद तर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी रितेश बैरागी यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील गंगावेस, वावी वेस, विन्नर नगर, विजय नगर, लोंढे गल्ली, काजीपुरा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक इत्यादी परिसरात मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत सिन्नर शहरातील मतदारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे जाहीर आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, ताहीर शेख, बबलू शेख, राहुल जाधव, प्रकाश घेगडमल यांचे सह अधिकारी कर्मचारी, महिला, नागरिक उपस्थित होते.