ताज्या घडामोडी

जमजम कॉलनीतील कत्तलखाने उध्वस्त करणारे संदीप मिटके नाशिकमध्येही एक्शन मोडवर शहरातील गोवंश तस्करांना इशारा


जमजम कॉलनीतील कत्तलखाने उध्वस्त करणारे संदीप मिटके नाशिकमध्येही एक्शन मोडवर

शहरातील गोवंश तस्करांना इशारा

नाशिक प्रतिनिधी
कर्तृत्वाला संधी मिळाली तर ते निखरते अशी उदाहरणे अनेक आहेत. त्याच उदाहरणाची प्रचिती
संदीप मिटके यांनी पोलिस आयुक्तलयात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर आली.
संदीप मिटके हे पोलिस खात्यातील अत्यंत कर्तबगार अधिकारी म्हणून परिचित असून एक वर्षांपूर्वी पोलिस उप अधीक्षक म्हणून अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असतांना संगमनेर शहरातील गो वंश हत्येसाठी बदनाम असलेल्या जमजम कॉलनीतील बेकादेशीर कत्तलखाने उद्धवस्त करुन संभाव्य सामाजिक तणाव नियंत्रणात आणला होता. तत्पूर्वी अहमदनगर शहरात देखील अशाच प्रकारच्या बेकायदेशीर धंदे चालकांच्या मुसक्या बांधण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते.
एकूणच खाकीचा गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारे पोलिस अधिकारी म्हणून परिचित असलेले संदीप मिटके हे काही महिन्यांपूर्वी नाशिक पोलिस आयुक्तलयात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून बदलीवर रुजू झाले. त्यांची आजवरची एकूण कारकीर्द लक्षात घेता कार्यकारी पदावर त्यांची नियुक्ती क्रमप्राप्त होती. तथापी तत्कालीन परिस्थितीमुळे म्हणा किंवा अंतर्गत हितसंबंधामुळे त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पदस्थापना मिळाली नाही. एक जून रोजी त्यांच्या कर्तृत्वाला संधी देणारे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोलिस आयुक्तांनी पदस्थापना दिली. संदीप मिटके अशाच कार्यकारी पदाला न्याय देण्यासाठी पोलिस अधिकारी झाले असावेत अशीच त्यांची कार्यपद्धती आहे याची प्रचिती गुन्हे शाखेने टाकलेली कात सांगत आहे.
नाशिक शहरात अनेक अवैध व्यवसायासोबत गो वंश तस्करी आणि हत्या बिन दिक्कत सुरु आहे. असे बेकायदेशीर कत्तलखाने कुठे आहेत, त्यांचे चालक मालक कोण याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना माहीतच नाही असे अजिबात नाही. मात्र आजपर्यंत त्यांच्यावर माध्यमांनी आकांड तांडव केल्याशिवाय कारवाई करण्याचे धाडस गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त किंवा सहाय्यक पोलिस आयुक्तांनी दाखवले नव्हते.
ही परंपरा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच संदीप मिटके यांनी मोडीत काढली. आणि पाचव्याच दिवशी गोवंश हत्येसाठी बदनाम असलेल्या वडाळा गाव परिसरातील गो हत्याऱ्यांच्या मुसक्या बांधल्या.
इंदिरानगर पोलीस स्टेशन हददीत, वडाळागांव, नाशिक येथे सेंट सादीक स्कुलकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम हा गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विकी करण्याकरीता टेम्पो क्रमांक. एम. एच ४१ एयु ४०४९ हिचेत घेवून येणार असले बाबत माहीती मिळाल्यानंतर पोनि विदयासागर श्रीमनवार यांना हस्तांतरित करुन त्या गो वंश तस्कराच्या मुसक्या बांधल्या.
अझहर सफदर खान, वय ३१ वर्ष, रा. सल्ली पॉईंट, रानवाडाजवळ, वडाळागांव, या संशयितास ताब्यात घेवुन टेम्पोतील गोवंश जनावरांचे मांस जप्त केले. हा मुद्देमाल शोएब समद कुरेशी रा. वडाळागांव, नाशिक तसेच नजीर, व बबलु कुरेशी यांच्या सांगण्यावरून अजीज कादीर कुरेशी यांनी मला टेम्पोत भरून विकण्यासाठी पाठविले असल्याचे सांगितले.त्यास ताब्यात घेवुन सुमारे ७२५ कि. ग्रॅम. अंदाजे वजन असलेले मांस मिळाले तात्काळ पशु वैदयकीय अधिकारी यांना बोलावून मांस सॅम्पल साठी ताब्यात घेतले. सदर मांस हे तो विक्री करण्याकरीता नेत असल्याचे निष्पन्न झाले त्यावर पंचनामा करून वाहनासह एकुन ६,४५,०००/- रू. किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन अझहर सफदर खान याचे विरूध्द महा. प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित कलम २०१५ चे कलम ५ क, ५ ड भादंवि कलम-४२९,१८८ प्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाणेस पोअंमल/तेजस मते यांनी फिर्याद देवुन आरोपी यांस मुददेमालासह पो. ठाणेस ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक/विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं.२ कडील पोहवासंजय सानप, मनोहर शिदि, फ्टमेश्वर वराडे, पोअंमल विशाल कुंवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, स्वप्निल जुंद्रे यांनी केलेली आहे.

चौकट :-
या कारवाईत ज्या संशयितांची नावे समोर आली आहेत त्यांचा पूर्ण पत्ता माहित नाही असा उल्लेख पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोट मध्ये आहे. हा उल्लेख वाचल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले नाही तरच नवल. या संशयितांवर यापूर्वी किमान दोन वेळा कारवाई झाली आहे. इतकेच नाही तर यातील काही संशयित तडीपार केल्याचा गवगवा करण्यात आला होता तरीही त्यांची ओळख लपविण्यात कुणाला स्वारस्य आहे आणि का? हा प्रश्न मात्र प्रामाणिक कारवाईवर संशय निर्माण करणारा ठरू शकतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *