सिन्नर तालुक्यातील शेतीला दारणा म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे-शरद शिंदे यांचेसह शेतकऱ्यांची मागणी
सिन्नर तालुक्यातील शेतीला दारणा म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे-शरद शिंदे यांचेसह शेतकऱ्यांची मागणी
सिन्नर प्रतिनिधी
सतत दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या सिन्नर तालुक्याला दारणा म्हाळुंगीचे पाणी मिळावे अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की,
सिन्नर तालुका हा कमी पर्जन्यमान होत असल्याने दुष्काळी भाग आहे. तसेच भौगोलिकदृष्टय़ा उंचावर आहे. तीन बाजूने घाट आहेत. बारमाही वहाणार्या दारणा नदी पश्चिम व उत्तर सीमेवरून वाहते तर म्हाळूगी दक्षिण सीमेवरून वाहते.सिन्नर शहारा पासून अवघ्या 20 कि. मी.अंतरावरून वाहते .सदर नद्यांचे पाणी पाईप लाईन करून कोनांबे धरणात टाकून देवनदी, शिवनदी व कॅनॉल मार्फत सिन्नर तालुक्यातील पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण असा पूर्ण तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा करावा.कोनांबे सोनांबे सोनारी वडगांव हरसुले लोणारवाडी मुसळगाव दातली खोपडी धारणगाव गुळवंच एकलहरे किरतानगळी वडांगळी देवपूर पंचाळे बारागाव पिंपरी सुळेवाडी चिंचोली मोह जायगाव हिवरगाव कोमलवाडी असा पूर्ण शिवार ओलिताखाली येऊन शेती बागायती होऊ शकते. म्हाळूगी नदीचे पाणी बोगदा पाडून डुबेर जवळील जगबुडी बंधारा यात टाकून कॅनॉल मार्फत डुबेर ,वाडी,आटकवडे पाटोळे मनेगांव गोंदे कुंदेवाडी मुसळगाव भोकनी दोडी नांदूर मरळ घोटीवाडी वललेवाडी वावी मलढोन मीरगाव शहा पितळेचीवाडी पाथरे शेती ओलिताखाली येऊन बागायती होऊ शकते.
सिन्नर तालुक्यातील शेतकरी कामाच्या दुष्काळाने हैराण झाला आहे. दारणा नदीचे पाणी आणतो असे आश्वासन देत 4 आमदार झाले. माणिकराव कोकाटे 4 वेळा आमदार तर वाजेही आमदार झाले. परंतु सिन्नर तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा योजना राबवली नाही. राबवली असती तर सिन्नर तालुक्यातील शेतकरी निफाड कोपरगांव नगर येथील बागायती शेतकरी प्रमाणे द्राक्ष ऊस नगदी पीक घेवुन सुखी झाला असता. परंतु इच्छाशक्ति असलेले लोकप्रतिनिधी लाभले नाही. यामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी दुष्काळी राहिला. कर्जबाजारी झालाय उध्वस्त झालाय. असे या निवेदनात म्हटले आहे. दारणा म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्यातील शेतीला आणण्याची योजना राबवावी.
अन्यथा मंत्रालय समोर उपोषण करण्यात येईल. असा इशारा या निवेदनात दिला असून या निवेदनावर
तालुका प्रमुख शरद शिंदे
शिवाजी गुंजाळ उपाध्यक्ष
संदीप लोंढे शहराध्यक्ष
पूनजाराम हारक
दत्ताजी जाधव शेतकरी
सुरेश सानप शेतकरी
चिंधु गुंजाळ शेतकरी
राम बाबा शिंदे शेतकरी
रतन तुपे शेतकरी
जयश्री गायकवाड महिला आघाडी
मंगला मोरे
निशा वराडे
लीला तुपे
बालाबाई पवार
काशा शिंदे
शांता बाई शिंदे आदींच्या सह्या आहेत.